शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

४०० जणांनी केले रक्तदान

By admin | Updated: April 30, 2017 00:43 IST

निरंकारी मिशनचे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज इतर हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ देसाईगंज येथील ...

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम : ६५ महिलांनी केले रक्तदानदेसाईगंज : निरंकारी मिशनचे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज इतर हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे ३३५ पुरूष व ६५ महिला असे एकूण ४०० निरंकारी भक्त व नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ संघटनमंत्री विनायक सुरत्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, नानक कुकरेजा, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, पंचायत समिती उपसभापती गोपाल उईके, संत निरंकारी मंडळाचे नागपूर सेवा दल क्षेत्रीय संचालक रोशनलाल शर्मा, स्थानिक शाखेचे प्रमुख आसाराम निरंकारी, कुरखेडा शाखेचे माधवदास निरंकारी, रामलाल मोहनानी, हरिष निरंकारी, पंचायत समिती सभापती मोहन गायकवाड, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती दीपक झरकर, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील, राजेश जेठाणी, सचिन खरकाटे, गणेश फाफट, मेहमीदा पठाण, वर्षा कोकोडे, पं.स. सदस्य बौध्दकुमार लोणारे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, सदानंद कुथे, चांगदेव फाये, बबलू कुरेशी, खान, माजी नगराध्यक्ष महेश पापडकर, संतोष शामदासानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विनायक सुरत्ने यांनी निरंकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले रक्तदानाचे कार्य ईश्वरीय कार्य आहे, असे मार्गदर्शन केले. आमदार क्रिष्णा गजबे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून समर्पण भावनेने होत असलेल्या या सेवा कार्याची प्रशंसा केली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे सदस्य, रक्तपेढीचे कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय देसाईगंज, उपजिल्हा रूग्णालय आरमोरी, कुरखेडा, अहेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड, कोंढाळा, कोरची येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)