शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:09 IST

नागपूर-सिरोंचा बसमधून सुमारे ४० हजार रूपयांचा सुगंधित तंबाखू अहेरी पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे करण्यात आली. नागपूर आगाराची बस चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी मार्गे सिरोंचाकडे जात होती.

ठळक मुद्देआलापल्लीत कारवाई : ८० डबे भरलेल्या पोत्याची बसमधून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : नागपूर-सिरोंचा बसमधून सुमारे ४० हजार रूपयांचा सुगंधित तंबाखू अहेरी पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे करण्यात आली.नागपूर आगाराची बस चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी मार्गे सिरोंचाकडे जात होती. दरम्यान गोंडपिपरी येथे सुगंधित तंबाखूचा पोता बसमध्ये ठेवला. याबाबतची गोपनीय माहिती आलापल्लीचे वाहतूक पोलीस हवालदार बेगलाजी दुर्गे यांना प्राप्त झाली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली येथे बस थांबवून पाहणी केली असता, बसमध्ये सुगंधित तंबाखू भरलेले पोते आढळून आले. पोते उतरवून पोलिसांनी बसचालक व वाहक यांना ताब्यात घेतले. सदर सुगंधित तंबाखू गोंडपिपरी येथील सागर चर्लावार यांनी बसमध्ये चढविल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी चर्लावार याला चौकशीसाठी बोलविले आहे. सदर सुगंधित तंबाखू नेमका कुणाला पोहोचवायचा होता, हे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे ८० डब्यांचा पोता एसटीच्या वर ठेवणे आवश्यक असतानाही बस वाहकाने सदर पोता सिटच्या खाली ठेवण्यास कशी काय परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून वाहक सुद्धा या प्रकरणात दोषी असल्याचे दिसून येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळाजी शिंदे, वाहतूक पोलीस हवालदार बेगला दुर्गे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस