शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांचा ४0 टक्के पुरवठा

By admin | Updated: May 29, 2014 02:18 IST

पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने ..

गडचिरोली : पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली असून सध्यास्थितीत एकूण मागणीच्या ४0 टक्के बियाणे उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष बियाणे पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत शेतकर्‍यांना आवश्यक तेवढे बियाणे उपलब्ध होईल, असा विश्‍वास कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

काही वर्षापूर्वी शेतकरी वर्ग परंपरागत बियाणांचा वापर करीत होता. या बियाणांची उगवण क्षमता कमी राहत असल्याने बियाणांचा वापर जास्त करावा लागत होता. त्याचबरोबर या बियाणांमुळे उत्पादन वाढीस र्मयादा पडत होत्या. इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रातही संशोधन झाले. यामध्ये संकरीत वाणांचा शोध लावण्यात आला.

जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. चालू खरीप हंगामात १ लाख ६५ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. एकूण उत्पादनात धान पिकाचा वाटा ८0 टक्केपेक्षाही जास्त आहे. चालू खरीप हंगामासाठी २५ हजार ७४0 क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. सध्यास्थितीत ११ हजार ४८२.३0 क्विंटल धान पिकाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. धान पिकाचे पर्‍हे टाकण्यासाठी आणखी १५ ते २0 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी बियाणांची टंचाई भासणार नाही. यातून निर्माण होणारा काळाबाजारही थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबिन या पिकाच्या पेर्‍यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सदर पीक मध्यम व कोरडवाहू जमीनीमध्ये घेता येत असल्याने दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येते.

धान पिकाच्या लागवडीपेक्षा सोयाबिन पिकाच्या लागवडीचा खर्च अत्यंत कमी आहे. एकदा पेरणी केल्यानंतर या पिकाची फारशी काळजी घेण्याची गरज राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग या पिकाकडे वळत चालला आहे. त्याचबरोबर जी जमीन आजपर्यंत पडीत होती. अशा जमीनीत सोयाबिनचे उत्पादन घेतले जात आहेत. चालू खरीप हंगामात ४ हजार ३५0 हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ९५७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. त्यापैकी ५७.६0 क्विंटल बियाणे उपलब्ध झाली आहेत.

उर्वरीत बियाणे पाऊस पडेपर्यंत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. सोयाबिन पिकानंतर तूर, कापूस, मका, उडीद याही पिकांचे जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासाठीसुध्दा आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

(नगर प्रतिनिधी)