शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४० सिंचन विहिरी अपूर्णच

By admin | Updated: May 24, 2016 01:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह मंजूर झालेल्या ४० सिंचन विहिरी तीन वर्ष उलटूनही अपूर्ण स्थितीत आहेत.

तीन वर्षे उलटली : रोजगार हमी योजनेतून कामे मंजूरसिरोंचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह मंजूर झालेल्या ४० सिंचन विहिरी तीन वर्ष उलटूनही अपूर्ण स्थितीत आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाकडून सदर कामाची अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे. तथापी २०१६ चा खरीप हंगाम ऐन तोंडावर येऊनही संबंधित प्रशासनाकडून सिंचन विहीर बांधकामाबाबत हालचाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे. उपरोक्त ४० सिंचन विहिरीच्या बांधकामासंदर्भात वरिष्ठ भूवैद्यानिकांनी रितसर शिफारस पत्रही दिले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१२-१३ या वित्तीय वर्षात सिरोंचा तालुक्यातील एकूण १५८ सिंचन विहिरींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सिरोंचा पंचायत समितीकडून सादर करण्यात आला. त्यानुसार सर्व विहिरींचा कार्यान्वय आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून पं.स. यंत्रणेस देण्यात आला. यापैकी आतापर्यंत ९८ लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित ६० लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याच्या कारणामुळे त्यांच्या सिंचन विहिरींचे कामे स्थगित ठेवण्यात आली. या ६० विहिरींचा अनुशेष अद्यापही कायम आहे. असे असताना सन २०१३-१४ या वर्षात जि.प. सिरोंचा शाखेकडून नियोजनातल्या ४० विहिरींची प्रस्तावित यादी जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरीस्तव सादर करण्यात आली. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे विभाग) जि.प. गडचिरोली, सिरोंचा तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आला. शिवाय कार्यकारी अभियंत्यांनी २९ आॅक्टोबर २०१३ च्या पत्रान्वये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकास पत्र दिले. या पत्रात भूजल उपलब्धता प्रमाणपत्रासह शिफारस व अभिप्राय देण्याची विनंती केली आहे.भूजल वैज्ञानिकांनी ७ डिसेंबर २०१३ च्या पत्रान्वये तशी अनुकूलता दर्शविणारी पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले. या पत्राच्या प्रतिलिपी सिरोंचा तहसीलदार, सिंचाई उपविभागाचे अहेरी स्थित उपविभागीय अधिकारी यांनाही दिले आहे. असे असूनही संबंधित लाभार्थी वंचितच आहेत. (तालुका प्रतिनिधी)असा आहे मंत्रालयीन आदेशशेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी संदर्भात शासन निर्णय क्रमांक नियोजन विभाग मग्रारोहयो / २०११ / प्र. क्र. २४/ रोहयो - १० अ / मंत्रालय मुंबई दिनांक १० मार्च २०११ चा सुस्पष्ट आहे. शासन निर्णय असूनही मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे पात्र लाभार्थ्यांनाही सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.