शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१६१ सरपंचांना मिळणार चार हजार रुपये मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:17 IST

राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना तीन हजार तर १६१ सरपंचांना महिन्याकाठी चार हजार रुपये मानधन मिळणार आहे.

ठळक मुद्देउपसरपंचांनाही लाभ : २९२ सरपंच तीन हजारांचे मानकरी

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना तीन हजार तर १६१ सरपंचांना महिन्याकाठी चार हजार रुपये मानधन मिळणार आहे.उपसरपंचांनासुध्दा ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये मानधन महिन्याकाठी मिळणार आहे. पूर्वीपेक्षा आता सरपंचांच्या कर्तव्यात व कामांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीचे अधिकार वाढविल्याने सरपंचांना ग्रामपंचायतीच्या कामासाठी बराच वेळ द्यावा लागतो. शिवाय वाढत्या महागाईत सरपंचांना आर्थिक अडचण जाणवते. सन २००९ नंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच संघटनेकडून सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. लोकप्रतिनिधींकडेही ही मागणी रेटून धरण्यात आली होती. अखेर या मागणीचा विचार करून राज्याच्या ग्राम विकास विभागाने लोकसंख्येनुसार सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्यात १२ पंचायती समिती असून सद्य:स्थितीत एकूण ४५५ ग्रामपंचायती आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ४५६ ग्रामपंचायती होत्या. आरमोरी ही नगर परिषद झाली व या नगर परिषदेत अरसोडा ग्रामपंचायतीचा समावेश झाला. त्यामुळे आता ग्रामपंचायतीची संख्या ४५५ झाली आहे. जिल्ह्यात ० ते १ हजार लोकसंख्या असलेल्या ७६ ग्रामपंचायती आहेत. एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या २१६ ग्रामपंचायती आहेत. दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या २९२ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना महिन्याकाठी तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे. २ हजार १ ते ३ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या १०४ ग्रामपंचायती आहेत. ३ हजार १ ते ४ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या ३५ ग्रामपंचायती, ४ हजार १ ते ५ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या १३, ५ हजार १ ते ६ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती सात आहेत. ६ हजार १ ते ७ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या दोन, ८ हजार १ ते नऊ लोकसंख्या असलेली एक व १ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली एकच ग्रामपंचायत आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लोकसंख्येच्या आधारे जुलै महिन्यापासून वाढीव मानधन मिळणार आहे.१७ ग्रामपंचायती अजुनही सरपंचाविनाअहेरी उपविभागात नक्षली दहशत तसेच इतर कारणांमुळे सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी कोणी नामांकनच दाखल केलेले नाही. परिणामी दुर्गम भागात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहाते. अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. जवळपास १० ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अपात्र ठरल्याने उपसरपंचाकडे प्रभार देण्यात आला आहे. सध्या प्रशासन व उपसरपंचाकडे सरपंचपदाचा प्रभार असणाऱ्या १७ ग्रामपंचायती असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच भामरागड, सिरोंचा, अहेरी, कोरची, कुरखेडा आदी तालुक्यातील सरपंचपदाची पोटनिवडणूक घेण्यात आली. परंतू यावेळीही अनेक ठिकाणची पदे रिक्त राहिली.काही ग्रामपंचायतींचा कारभार उपसरपंचाकडेप्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुका घेतल्या जातात. मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची पदे रिक्त राहत असल्याने दरवर्षी पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. जिल्ह्यातील काही उपसरपंचाकडे सरपंचपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र अशा नेमक्या किती ग्रामपंचायती आहेत, याची माहिती जि.प. प्रशासनाकडे नाही. या संदर्भाची माहिती सर्व पंचायत समितीस्तरावरून मागविण्यात आली असल्याचे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत