शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांच्या खत विक्रीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:15 IST

कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कृषी केंद्रांची तपासणी केली असता, आरमोरी व कुरखेडा तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये खते व कीटकनाशके विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : तपासणीत आढळली अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कृषी केंद्रांची तपासणी केली असता, आरमोरी व कुरखेडा तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये खते व कीटकनाशके विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या कृषी केंद्रांमधील ४ लाख २० हजार रूपये किंमतीच्या खत व कीटकनाशकांच्या विक्रीस कृषी विभागाने बंदी घातली आहे.कृषी विकास अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण यांनी सदर कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कृषी केंद्रांमध्ये आरमोरी येथील शेतकरी कृषी केंद्र, कुरखेडा येथील गितेश्वर कृषी केंद्र, रामगड येथील मे. दिनेश कृषी केंद्र, मालेवाडा येथील मे. रॉय कृषी केंद्र या कृषी केंद्रांचा समावेश आहे. कृषी केंद्राची तपासणी केली असता, दर्शनी भागामध्ये खत उपलब्धतेबाबतची माहिती न लावणे, दरपत्रक न लावणे, रासायनिक खत विक्रीचे अहवाल प्राधिकाºयास सादर न करणे आदी त्रूट्या आढळून आल्या. रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ३५ (१ बी) कीटकनाशक अधिनियम १९६८ खंड २१ (१) (ड) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील ईसीए ३ (२), सी ३ (२) (१) या तरतूदींचा भंग केला आहे. त्यामुळे सदर कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी उद्योग खताच्या ४४ बॅग, युरिया खताच्या ३४ बॅग, सिंगल सुफर फास्पेटच्या ३१९ बॅग, कृषी देव खताच्या १२ बॅग, जैविक खताच्या १०० बकेट, कीटकनाशकांमधील ११ प्रकारच्या औषधांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.शेतकºयांनी कोणत्याही खतविक्रेत्याला अधिकची किंमत देऊ नये, जादा दराने विक्री होत असेल तर याबाबतची माहिती तत्काळ तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, गावचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी सभापती नाना नाकाडे, कृृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी केले आहे. या कारवाईमुळे अवैध खत विक्रीला आळा बसणार आहे.जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे खतांचा मुबलक साठाजिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकºयांनी कोणत्याही खतविक्रेत्याला अधिकची किंमत देण्याची गरज नाही. पॉस मशीनमधून बिल निघत असल्याने बिलावर दर्शविलेली किंमतच खत विक्रेत्याला द्यावी, राष्टÑीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स या कंपनीच्या मार्फत ९ आॅगस्ट रोजी २९५ रूपये प्रती बॅग निंबोळीयुक्त युरिया खताचा ९५० मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. त्यामुळे युरिया खताचीही टंचाई नाही. निंबोळयुक्त युरियामधील नत्र भातपिकास चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून निंबोळीयुक्त युरियाचा पुरवठा करण्यात येत आहे. सध्या पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने युरियाचा अती वापर टाळावा, नत्राच्या जास्त वापरामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भात पिकास फुटवे फुटण्याच्या किंवा गर्भावस्थेत १९ : १९ : १९ हे फवारणीद्वारे द्याचे खत विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे. एकरी एक किलो खत वापरल्यास धान पिकास त्याचा फायदा होतो, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.