शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना ३९३ परवाने

By admin | Updated: August 9, 2014 01:10 IST

राज्य शासनाच्या २५ जून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचत ...

दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाच्या २५ जून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचे २१९ व केरोसीन दुकानाचे १८४ असे एकूण ३९३ परवाने २०११ पासून दिले आहेत. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोलाची मदत झाली आहे.३ नोव्हेंबर २००७ रोजी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय काढून स्वयंसाहाय्यता बचतगटांना स्वस्त धान्य दुकान व करोसीन दुकानाचे परवाने देण्याची तरतूद केली. त्यानंतर राज्य शासनाने २५ जून २०१० रोजी नवा शासन निर्णय काढून महिला तसेच पुरूष स्वयंसाहाय्यता बचत गटांना स्वस्तधान्य व केरोसीन दुकानाचे परवाने देण्याची तरतूद केली. जिल्हा प्रशासनाने या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करीत आवश्यकतेनुसार महिला बचत गटांना स्वस्तधान्य व केरोसीन दुकानाचे परवाने दिले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने २५ जून २०१० च्या शासन निर्णयानुसार महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचे एकूण २१९ परवाने दिले आहेत. यात गडचिरोली तालुक्यात १७, धानोरा तालुक्यात २९, चामोर्शी तालुक्यात ३२, मुलचेरा तालुक्यात १९, देसाईगंज तालुक्यात १०, आरमोरी तालुक्यात १३, कुरखेडा तालुक्यात १७, कोरची तालुक्यात २१, अहेरी तालुक्यात १३, एटापल्ली तालुक्यात २३, भामरागड तालुक्यात ५ व सिरोंचा तालुक्यात २५ परवाने देण्यात आले आहेत. एकूण १ हजार ६८८ गावांकरिता जिल्हाभरात स्वस्त धान्य दुकानाचे एकूण १ हजार ११० परवाने देण्यात आले असून यात १८९ वैयक्तिक तर स्वयंसहाय्यता बचत गटांना दिलेल्या १२१ परवान्यांचा समावेश आहे. परवाने दिल्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असून महिलांची प्रगती होत आहे. पुरवठा विभागाने नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या मंजुरीसाठी एकूण १४३ जाहीरनामे काढले आहेत. ग्रामसभेच्या शिफारशीकरिीाा पुरवठा विभागाकडून एकूण ७५ परवाने सादर करण्यात आल्याची माहिती आहे.