शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

३८ कोटी ६२ लाखांची थकबाकी

By admin | Updated: November 16, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी पंपधारक, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत, सार्वजनिक सेवा व तात्पुरती स्वरूपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या एकूण १ लाख १३ हजार ३९४ ग्राहकांवर

विद्युत देयके : १ लाख १३ हजार ३९३ ग्राहकांकडेदिलीप दहेलकर - गडचिरोलीजिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी पंपधारक, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत, सार्वजनिक सेवा व तात्पुरती स्वरूपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या एकूण १ लाख १३ हजार ३९४ ग्राहकांवर ३८ कोटी ६२ लाख ३० हजार ७४० रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी पंपधारक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाबत्तीसाठी तसेच नळ पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या ग्राहकांवर आहे. थकबाकीदार ग्राहकांची संख्या विचारात घेतल्यास सर्वाधिक ग्राहक घरगुती कनेक्शनधारक आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाच्या ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात विद्युत बिल थकीत आहे. दवाखाने, पोलीस ठाणे, डाक विभाग अशा सार्वजनिक सेवा असलेल्या तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांवरही विद्युत देयके थकीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात महावितरणचे गडचिरोली व आलापल्ली हे दोन विभाग आहेत. गडचिरोली विभागांतर्गत आरमोरी, धानोरा, गडचिरोली, कोरची व कुरखेडा आदी सहा उपविभाग आहेत. तर आलापल्ली विभागात भामरागड, आलापल्ली, चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा या सहा उपविभागाचा समावेश आहे. आलापल्ली विभागातील ५० हजार २२ वीज कनेक्शन घेतलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांवर १७ कोटी ४६ लाख ६५ हजार ३११ रूपयांची विद्युत देयकापोटी थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील ६३ हजार ३७२ सर्व प्रकारच्या ग्राहकांवर २१ कोटी १५ लाख ६५ हजार ४२९ रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. आलापल्ली विभागात एकूण १९ हजार ९३४ घरगुती वीज कनेक्शनधारकांकडे १४ कोटी ४४ लाख १ हजार ५९० रूपयांची थकबाकी आहे. १ हजार १६७ व्यावसायीक वीजधारकांकडे ३९ लाख ५ हजार ६३० रूपयांची थकबाकी आहे. १७९ औद्योगिक वीज कनेक्शनधारकांकडे ९ लाख ४७ हजार ८४० रूपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक सेवेमधील ४९३ वीज ग्राहकांवर २२ लाख २७ हजार ७९९ रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. यामुळे महावितरणपुढे अडचण निर्माण झाली आहे.