शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन योजनांवरील खर्चात ३६ लाखांचा गैरव्यवहार

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

चामोर्शी पंचायत समितींतर्गत पशुधन विभागातर्फे राबविण्यात आललेल्या योजनांवर लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विभागाच्या खर्चाला पं.स. सदस्यांनी मान्यता दिली नाही.

चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितींतर्गत पशुधन विभागातर्फे राबविण्यात आललेल्या योजनांवर लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विभागाच्या खर्चाला पं.स. सदस्यांनी मान्यता दिली नाही. तर उलट संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली असल्याने खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार मे, जून २०१४ या अल्पावधीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) भोयर यांनी २०१३-१४ या वर्षातील प्राप्त निधी व खर्चाचा अहवाल सादर केला असता, त्या अहवालात प्रत्यक्ष खर्च व दाखविलेली माहिती यात मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार टी.एस.पी. शेळीगट, ओटीएसपी शेळी गट, एसीपी दुधाळ जनावर गट, एनटीएस कुकुट गट, ओटीएसपी तलंगा गट, एसपी दुधाळ जनावरे, खाद्य वाटप व कामधेनू अंतर्गत पशुपालक मंडळ स्थापन व सहल, वैरण विकास कार्यक्रम, निकृष्ठ चारा सकस करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, जनावरांचे मलमूत्र व खत व्यवस्थापन तसेच जीवनसत्व खरेदी, खनिजमिश्रण खरेदी, जिल्हा निधी बियाणे, एफएमडी अशा विविध योजनांवर ४० लाख ७५ हजार ०४० रूपयाचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ३६ लाख ५१ हजार ३३७ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या खर्चात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने पं.स. सभागृहाने सदर खर्च फेटाळून लावला व चौकशी समिती नेमण्याचा ठराव पारित करण्यात आला. यातील अनेक योजना राबविल्याच नाही. तर काही योजनांवर कमी खर्च करून अमाप पैसा खर्च दाखविण्यात आला आहे.