शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

तीन क्षेत्रात ३६ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 1, 2014 23:22 IST

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६७ आरमोरी, ६८ गडचिरोली व ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार मैदानात राहणार आहेत. आज गुरूवारी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी

१२ जणांनी घेतली माघार : सर्वाधिक १४ आरमोरीत, १३ गडचिरोलीत व ९ जण अहेरीतगडचिरोली : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६७ आरमोरी, ६८ गडचिरोली व ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार मैदानात राहणार आहेत. आज गुरूवारी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक १४ उमेदवार आरमोरी विधानसभा क्षेत्रात मैदानात असून १३ उमेदवार गडचिरोलीत व ९ उमेदवार अहेरी विधानसभा क्षेत्रात भाग्य आजमाविणार आहे. आज १२ उमेदवारांनी आपले नामांकन पत्र मागे घेतले. आरमोरी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये योगेश नामदेव गोन्नाडे, छगन पुणाजी शेडमाके, रामसुराम विश्राम काटेंगे व जयदेव हरेश्वर मानकर यांचा समावेश आहे. तर गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी अपक्षरीत्या भरलेला अर्ज आज मागे घेतला. याशिवाय गोपाल लक्ष्मण उईके, शंभुविधी देवीदास गेडाम, वासुदेव किसनजी शेडमाके, भूपेश उमाशंकर कुळमेथे, पुरूषोत्तम श्रावण गायकवाड, हरिशचंद्र नागोजी मंगाम यांचा समावेश आहे. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात मुतन्ना भीमय्या पेंदाम या एकमेव उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता एकूण ३६ उमेदवार तीन मतदार संघात रिंगणात आहेत. जिल्ह्यात खरी लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आहे. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाविस-भाजप आघाडी व अपक्ष दीपक आत्राम यांच्यात थेट सामना रंगणार आहे. जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार ३६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १५ आॅक्टोबर रोजी करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात १६ हजार ७६२ मतदारांची नव्याने भर पडली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)