लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने गडचिरोली येथे आदिवासी चालक प्रशिक्षण चालविले जात असून या केंद्रामार्फत १९९६ ते २०१६ या २० वर्षांच्या कालावधीत ४२१ आदिवासी युवकांना प्रशिक्षण दिले असून ३४१ युवकांना एसटी बसचालकाची नोकरी मिळाली आहे.आदिवासी युवकामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच आदिवासी युवक मिळत नसल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या एसटीतील चालकाच्या जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व गडचिरोली येथे आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. गडचिरोली येथील प्रशिक्षण केंद्र १९९६ रोजी सुरू झाले. आजपर्यंत या केंद्रातून एकूण २२ प्रशिक्षणार्थ्यांच्या तुकड्या निघाल्या आहेत. यामध्ये ४२१ प्रशिक्षणार्थ्यांना एसटी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ३४१ युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.चालक प्रशिक्षण केंद्राचा खर्च आदिवासी विकास विभाग व एसटी महामंडळाच्या वतीने उचलला जातो. गडचिरोली आगारात चालक प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र कार्यालय व बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून जड वाहन चालविण्याचा परवाना उपलब्ध करून दिला जातो. सद्य:स्थितीत २३ प्रशिक्षणार्थी एसटी चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
३४१ आदिवासी युवकांना मिळाला बस चालकाचा रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:43 IST
आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने गडचिरोली येथे आदिवासी चालक प्रशिक्षण चालविले जात असून या केंद्रामार्फत १९९६ ते २०१६ या २० वर्षांच्या कालावधीत ४२१ आदिवासी युवकांना प्रशिक्षण दिले....
३४१ आदिवासी युवकांना मिळाला बस चालकाचा रोजगार
ठळक मुद्दे१९९६ ला स्थापना : आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्र