शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

३४ उपकेंद्रांमध्ये होणार प्रसूती कक्ष

By admin | Updated: May 20, 2014 23:37 IST

एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांमध्ये प्रसुती कक्षाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. घरी प्रसूती करण्यामुळे बालमृत्यू

गडचिरोली : एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांमध्ये प्रसुती कक्षाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. घरी प्रसूती करण्यामुळे बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रसुती रूग्णालयातच करावी याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे मागील काही वर्षात रूग्णालयात प्रसूती होणार्‍या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश उपकेंद्रांमध्ये प्रसूतीची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यात प्रवासाची साधने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे गरोधर मातेला बैलबंडीमध्ये रूग्णालयापर्यंत घेऊन जावे लागते. प्रसूतीला उशीर झाल्याने माता किंवा नवजात बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रांमध्ये प्रसूती कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्या गेला आहे. यासाठी जवळपास २ कोटी रूपयाचा खर्च अपेक्षीत आहे. यामध्ये धानोरा तालुक्यातील जपतलाई, तुकुम, हेटी, साखेरा, चिचोडा, चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली, बोरी, आमगाव, लक्ष्मणपूर, लखमापूर, नवेगाव रै., रेखेगाव, अहेरी तालुक्यातील आलापल्ली, नवेगाव, कन्नेपल्ली, पुसुकपल्ली, कारसपल्ली, आरमोरी तालुक्यातील सोनेरांगी, चामोर्शी, आष्टा, मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली, सिरोंचा तालुक्यातील पुल्लीगुड्डम, अंकिसा चक, कोरची तालुक्यातील बेडगाव, गडचिरोली तालुक्यातील वसा, नगरी, मारोडा यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रसूती कक्षाच्या बांधकामासाठी ५ लाख ९५ हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.