शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात मार्ग रोखणाऱ्या ३३ पुलांची उभारणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

वर्गखोल्या व शाळांची दुरूस्ती, नगर पंचायत क्षेत्रातील जि.प.शाळांची दुरूस्ती, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, रस्त्यांची कामे तसेच जिल्हा परिषद फंडातून वर्ग ५ ते ८ च्या मुलांसाठी गडचिरोलीत वसतिगृहाची उभारणी असे ३२ ठराव मंजूर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जि.प.ला नियतव्यय मिळाले नाही. त्यामुळे नियोजन पूर्ण होऊ शकले नाही. ४ मे २०२० च्या जीआरनुसार ३३ टक्के निधीत कपात होणार आहे.

ठळक मुद्दे२४ बंधाऱ्यांनाही मंजुरी : प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जि.प.ची ‘जीबी’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच बुधवारी (दि.३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सर्वसाधारण सभा घेऊन ३२ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पावसाळी संपर्क तुटणाऱ्या गावांना जोडणाºया ३३ छोट्या पुलांच्या उभारणीला मंजुरी देण्यासोबत २४ पूलवजा बंधारे बांधण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या पहिल्या माळ्यावरील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, बांधकाम सभापती युधीष्ठिर बिश्वास, कृषी सभापती प्रा.रमेश बारसागडे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी पारधी, समाजकल्याण रंजिता कोडापे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.दुपारी १.३० च्या सुमारास सुरू झालेली ही सभा सायंकाळी ५.३० पर्यंत चालली.यावेळी वर्गखोल्या व शाळांची दुरूस्ती, नगर पंचायत क्षेत्रातील जि.प.शाळांची दुरूस्ती, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, रस्त्यांची कामे तसेच जिल्हा परिषद फंडातून वर्ग ५ ते ८ च्या मुलांसाठी गडचिरोलीत वसतिगृहाची उभारणी असे ३२ ठराव मंजूर करण्यात आले.लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जि.प.ला नियतव्यय मिळाले नाही. त्यामुळे नियोजन पूर्ण होऊ शकले नाही. ४ मे २०२० च्या जीआरनुसार ३३ टक्के निधीत कपात होणार आहे. तरीही प्राप्त होणाऱ्या निधीनुसार या ठरावांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले. प्रथमच अशा पद्धतीने सभा झाल्याने ती चर्चेचा विषय झाली.१२ पंचायत समित्यांमधून लाईव्ह संवादया व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सर्व १२ पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि त्या-त्या क्षेत्राचे सदस्य जमले होते. अंतराच्या नियमाचे पालन करत आपले म्हणने मांडून त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जि.प.मधील सर्व विभाग प्रमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉलच्या समोरील जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या कक्षात बसले होते. ज्यांच्याशी संबंधित विषय येईल त्या अधिकाºयांना पाचारण केले जात होते.डीपीसीचा आढावाही प्रथमच जि.प.मध्येजिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीचा आढावा घेऊन पुढील मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जिल्हा परिषदेत हजेरी लावली. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी अधिकाºयांसोबत बैठक घेतली. यावेळी चर्चा करताना पालकमंत्र्यांनी जेवढा निधी लागतो तेवढा मागा, पण मिळालेला निधी वेळेत खर्च करा, असे निर्देश अधिकाºयांना दिले. आपल्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्यात १०० वॉटर एटीएम देणार असून त्यासाठी गावांची यादी देण्याची सूचना त्यांनी केली.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग