शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पुढील निवडणुकांसाठी मिळणार ३२०० ‘व्हीव्हीपॅट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:10 IST

देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधील निकालानंतर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) घेतल्या जात असलेली शंका आणि त्याला होत असलेला विरोध पाहता २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे उपकरण लागणार आहे. जिल्ह्यातील जुन्या सर्व ईव्हीएम बदलून नवीन ३२०० व्हीव्हीपॅट येणार आहेत.

ठळक मुद्देजुन्या ईव्हीएम बदलणार : मतदानाच्या मुद्रित नोंदची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधील निकालानंतर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) घेतल्या जात असलेली शंका आणि त्याला होत असलेला विरोध पाहता २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे उपकरण लागणार आहे. जिल्ह्यातील जुन्या सर्व ईव्हीएम बदलून नवीन ३२०० व्हीव्हीपॅट येणार आहेत.सन २००० पासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जात आहे. ही मतदान यंत्रे हैदराबाद येथील कंपनीने पुरविली होती. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या एकतर्फी निकालानंतर या यंत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत तर शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड झाला. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. त्यामुळे आता ईव्हीएमला व्हीव्हीपॅट (वोट व्हेरीफाईड पेपर आॅडीट ट्रेल) हे यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र बंगलोर येथील बेल कंपनीकडून पुरविले जाणार आहे.७ सेकंदपर्यंत दिसणार दिलेले मतव्हीव्हीपॅट लागल्यानंतर मतदाराने कोणाला मत दिले हे यंत्राच्या स्क्रीनवर ७ सेकंदपर्यंत पाहता येईल. त्यामुळे आपण ज्या नावासमोरील बटन दाबले त्यालाच मत गेल्याची खात्री मतदाराला करता येईल. याशिवाय त्या मताची मुद्रित स्लिप व्हीव्हीपॅटमध्येच जमा राहील. मतमोजणीच्या वेळी कोणी आक्षेप घेतल्यास त्या मुद्रित स्लिपवरून मतमोजणीची पडताळणी होऊ शकेल.