शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहनांसह ३१ लाख १४ हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:06 IST

तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत.

ठळक मुद्दे ट्रकचालकास पकडले : दारूच्या पेट्यांनी भरलेला ट्रक सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत. दोन्ही वाहनासह ३१ लाख १४ हजार रूपयांची दारू अहेरी पोलिसांनी गुरूवारी जप्त केली. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूतस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये अब्दुल सईद अब्दुल अजिज शेख (४७) रा. चंदनगर इंदौर (मध्यप्रदेश), धर्मा निमाई रॉय रा. चामोर्शी, राजू मुलन्ना रा. ट्रान्सपोर्ट नगर इंदौर (मध्यप्रदेश) तसेच ट्रक व टाटा सुमो वाहनाच्या चालक व मालकाचा समावेश आहे.तेलंगणा राज्यातून दारूबंदीच्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध तस्करी होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने गुरूवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सापळा रचला होता. यादरम्यान सिरोंचाकडून येत असलेल्या एमएच ३४, एए ००२५ या पायलट वाहनासह एमपी ०९, एचएफ ३३८१ या क्रमांकाच्या ट्रकला अडवून पोलीस पथकाने चौकशी केली. त्यावेळी दोन्ही वाहनात हजारांवर पेट्या विदेशी दारू आढळून आली. ही दारू जप्त करून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.पोलिसांनी वाहनातून ८ लाख ६४ हजार रूपयांची दारू जप्त केली. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनाची किंमत मिळून एकूण २२ लाख ५० हजार रूपये आहे.विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या एमएच ३४, एए ००२५ या क्रमांकाच्या वाहनावर शिवसेना व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल या नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे दारू तस्करीच्या या अवैध साम्राज्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लागेबांधे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.अहेरी पोलीस ठाण्यात ट्रकमधून दारूच्या पेट्या उतरविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी नेमकी किती रूपयांची व किती पेट्या दारू जप्त केली, तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव व इतर आरोपी याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती.पकडलेल्या वाहनाशी आपला संबंध नाही- चंदेलअहेरी पोलिसांकडून दारू वाहतूक कारवाईदरम्यान काळ्या रंगाची ग्रँडी कंपनीचे जे चारचाकी वाहन अहेरी भागात पकडण्यात आले. त्या वाहनावर शिवसेना व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल नावाचा स्टिकर चिटकविलेला होता. परंतु पकडलेले संबंधित वाहन हे आपल्या मालकीचे नाही, असे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी म्हटले आहे. माझ्याकडे असलेले झायलो कंपनीचे काळ्या रंगाचेच वाहन आहे. त्या वाहनासमोर शिवसेना व मागे माझ्या नावाचा उल्लेख असलेला स्टिकर आहे. मला दुपारी २ वाजता व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या व्हिडीओ क्लिपवरून समजले. माझ्या झायलो कंपनीच्या वाहनाचा नंबर एमएच-३१-सीएस-००८६ आहे. माझ्या नावाचा उल्लेख वाहनावर असल्याने मला मन:स्ताप झाला आहे. माझी गाडी बिघडल्याने गडचिरोली येथील गॅरेजमध्ये दुरूस्तीला ठेवण्यात आली आहे.