शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

३१ ग्रामपंचायतीची निवड

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी

वार्षिक कृती आराखडा : ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर प्रशासनाचा भरगडचिरोली : वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे. या अभियानातून ग्रामीण भागात स्वच्छतेवर भर देण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविलेला आहे. केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी देण्याकरिता २३ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात राष्ट्रीय स्वच्छता अभियान या नावाने जनसंवाद माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक पार पडली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, निर्मल दुत, रोजगार सेवक, जलसुरक्षा तसेच परिसर यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील कुटुंबांना भेटी देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे, शाळांमध्ये मुला, मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, हात धुण्याचे महत्व, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा आदीबाबत संदेश पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी अधिकाधिक गृहभेटी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून ग्रामस्तरावर सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाने केले आहे. वार्षिक कृती आराखड्यात निवड करण्यात आलेल्या ३१ ग्रामपंचायतीमध्ये कोरची तालुक्यातील सातपुती, बेतकाठी, बेडगाव, कुरखेडा तालुक्यातील पलसगड, बेलगाव, अंगारा, आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, आमगाव, गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, मुडझा, काटली आदी गावांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, पोटगाव, विहिरगाव, सावंगी, कुरूड, तुळशी, शंकरपूर, कोकडी, बोडधा तसेच धानोरा तालुक्यातील लेका, मुलचेरा तालुक्यातील लगाम, एटापल्ली तालुक्यातील जांभिया, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द व सिरोंचा तालुक्यातील वडधम, डोंगरगाव, विसोरा आदी गावांचा समावेश आहे.विशेष अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोरची तालुक्यातील बेलगाव घाट, कोसमी क्र. २, नांगपूर, कुरखेडा तालुक्यातील शिवणी, घाटी, चिरचाडी, कढोली, खेडेगाव, नरचुली, कासवी, गडचिरोली तालुक्यातील विहीरगाव, चुरचुरा, वसा, मुरखळा व कोटगल आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील कारवाफा, मिचगाव बुज, दराची, सुंदरनगर, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील हळदवाही, आष्टी, दुर्गापूर, गिलगाव, सोनापूर, एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली, वाघेझरी आदी ग्रामपंचायतीचा तसेच अहेरी तालुक्यातील नागेपल्ली, वेलगुर, देवलमरी, बोरी व सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलराव पेठा या एकमेव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या गावात शौचालयाची निर्मिती होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)