शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

३१९१ ‘श्रीं’ची स्थापना होणार

By admin | Updated: September 4, 2016 01:48 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराया आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला पाच सप्टेंबर सोमवारपासून सुरूवात होत आहे.

उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ : शांतता व सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्तगडचिरोली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराया आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला पाच सप्टेंबर सोमवारपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात यावर्षी ४९३ सार्वजनिक, २ हजार ५०६ खासगी व एक गाव एक गणपतीची संकल्पना १९२ गावात राबविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार १९१ गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.भामरागड पोलीस उपविभागांतर्गत पाच सार्वजनिक व १९ खासगी गणरायांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९८ सार्वजनिक, एक हजार खासगी, आरमोरी पोलीस ठाण्यांतर्गत ६० सार्वजनिक तर १४५ खासगी, पोटेगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत पाच सार्वजनिक व ३४ खासगी, घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत पाच सार्वजनिक, १४० खासगी अशा एकूण २०८ सार्वजनिक व १ हजार ८३९ खासगी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. धानोरा पोलीस उपविभागांतर्गत येरकड, चातगाव, मुरूमगाव व धानोरा पोलीस ठाण्याचा समावेश असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक आठ व ५३ खासगी गणपती मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. अहेरी पोलीस उपविभागांतर्गत अहेरी, आष्टी, मुलचेरा, पेरमिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ६७ सार्वजनिक व २६० खासगी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. जिमलगट्टा पोलीस उपविभागांतर्गत देचलीपेठा, मरपल्ली, रेपनपल्ली व जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खासगी ४० व सार्वजनिक १२ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. सिरोंचा पोलीस उपविभागांतर्गत आसरअल्ली, बामणी, रेगुंठा, सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ३० सार्वजनिक व खासगी ३३ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. पेंढरी कॅम्प कारवाफा विभागांतर्गत जारावंडी, गोडलवाही, गट्टा (फूलबोडी) व पेंढरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खासगी ११ व पाच सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. कुरखेडा कॅम्प देसाईगंज पोलीस उपविभागांतर्गत कोटगूल, मालेवाडा, बेडगाव, कोरची, पुराडा व कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सार्वजनिक १४१ व खासगी १३२ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत जारावंडी व एटापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सार्वजनिक १७ व खासगी १३० गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांची या उत्सवावर नजर राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)१९२ गावांत एक गाव एक गणपतीगावात एकात्मता राहून गावात शांततेने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने एक गाव एक गणपतीची संकल्पना दरवर्षी जिल्ह्यात राबविली जाते. यंदा जिल्ह्यात एकूण १९२ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत ५८, धानोरा पोलीस उपविभागांतर्गत २५, अहेरी उपविभागांतर्गत २३, जिमलगट्टा उपविभागांतर्गत चार, सिरोंचा उपविभागांतर्गत २८, कारवाफा उपविभागांतर्गत ११, देसाईगंज उपविभागांतर्गत ३९ व एटापल्ली उपविभागांतर्गत ४ गावांचा समावेश आहे.राज्य शासनाने यावर्षीपासून सर्व जिल्ह्यात लोकमान्य उत्सवातील महत्त्वाच्या विषयावर सार्वजनिक गणेश मंडळांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ, जलसंवर्धन आदी विषयांवर देखावे व उत्कृष्ट सजावट करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सार्वजनिक गणेश मंडळ अनेक स्पर्धांचे आपल्या स्तरावर आयोजन करून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विद्युतीकरण व रोषणाईकरिता तात्पुरती वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.