भेट : नितीन गडकरी व अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात विविध मुद्यांवर चर्चागडचिरोली : केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांची परिवहन भवन दिल्ली येथे राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत उपलब्ध निधी मधून ना. गडकरी यांनी ३०० कोटी रूपये मंजूर केले. तसेच रोजगार, नवीन उद्योग निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच ना. आत्राम यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात चर्चा करताना जिल्ह्यातील साकोली-मुलचेरा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याबाबतही विनंती ना. गडकरी यांच्याकडे केली. या महामार्गाचे काम लवकर झाल्यास दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे ना. आत्राम यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सांगितले. यावर ना. गडकरी यांनी दुर्गम भागातील महामार्गाला प्राधान्याने लक्ष दिले जात असल्याचे सांगत गडचिरोली भागात असलेल्या या महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल असे आश्वासन ना. गडकरी यांनी दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा विकासासाठी ३०० कोटी मंजूर
By admin | Updated: August 27, 2015 01:42 IST