शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

३ हजार ७१ उमेदवार देणार लेखी परीक्षा

By admin | Updated: May 3, 2016 01:55 IST

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल महिनाभर पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचा जम्बो कार्यक्रम

गडचिरोली : जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल महिनाभर पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचा जम्बो कार्यक्रम पार पडला. या चाचणीत पात्र झालेले एकूण ३ हजार ७१ उमेदवार ८ मे रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला पोलीस शिपायांच्या ८२ पदासाठी भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर या पदभरतीसाठी तब्बल २७ हजार उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. कागदपत्राची तपासणी पूर्ण झाल्यानंतर उंचीत बसणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. सदर चाचणीचा कार्यक्रम २५ ते २८ दिवस चालला. कमी उंचीमुळे अनेक उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरले तर दुर्गम भागातील काही उमेदवार शारीरिक चाचणीसाठी हजर झाले नाही. जवळपास १५ हजार वर उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी केली. एका पदाला १५ उमेदवार यानुसार एकूण १६७ जागांसाठी ३ हजार ७१ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुरूष २ हजार ५७९ व ४९२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महिलांसाठी ५० जागा राखीव४पोलीस शिपाई पदाच्या एकूण १६७ जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांसाठी ५० जागा राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये खुला प्रवर्गाचे २४, अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती १२, विजअ १, भजब २, भजक १, भजड १, विमाप्र १ व इतर मागासवर्गीयांसाठी ३ जागा आहेत. सदर पोलीस भरतीत एकूण १६७ जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक ८१, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २०, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ४० व इतर मागासवर्गीयांसाठी १० जागा आरक्षणानुसार ठेवण्यात आल्या आहेत.