शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या दुर्गम भागातही मिळणार ३-जी सेवा; ४० टॉवर्सला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:50 IST

जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात संपर्क माध्यमांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नव्याने ४० टॉवर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार ८१ टॉवर्सचे काम

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी संपर्क अभावानेच होतो. या भागात संपर्क माध्यमांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नव्याने ४० टॉवर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या ४१ टॉवरच्या उभारणीचे कामही सुरू आहे.येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व ८१ टॉवरची उभारणी करून दुर्गम भागात ३-जी आणि किमान २ जी सेवा पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन टॉवरची उभारणी करताना जुन्या सर्व टॉवरची क्षमता वाढविली जात आहे. त्यावरून ३-जी इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे. सध्या ग्रामीण भागात खासगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर मोजकेच आहेत. त्यामुळे नागरिकांना बीएसएनएल या सरकारी कंपनीची सेवा घ्यावी लागते. परंतु ही सेवाही अतिशय तोकड्या स्वरूपात आहे. मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे योग्य सेवा देण्यासाठी बीएसएनएलने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी मंजुरी मिळालेल्या ४१ टॉवरपैकी ५ गडचिरोली शहर व लगतच्या परिसरात तर ३६ शहराबाहेर लावले जात आहेत. आता आणखी ४० टॉवरला मंजुरी मिळाली असून ते सर्व ग्रामीण व दुर्गम भागात लागणार आहेत. ४०० किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जिल्ह्यात सध्या बीएसएनएलचे केवळ १३८ टॉवर आहेत. याशिवाय सीआरपीएफच्या कॅम्पसाठी ४१ टॉवर लावले आहेत. त्यापैकी ३० टॉवरवरच इंटरनेट सुविधा आहे. मात्र आता सर्व टॉवरवरून हायस्पीड सेवा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचे बीएसएनएलचे जिल्हा व्यवस्थापक एम.ए.जीवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१९३ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्याजिल्ह्यातील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यासाठी बीएसएनएलने काम सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २४० ग्रामपंचायतीत नेट सेवा सुरू केली जात आहे. आजमितीस त्यापैकी १९३ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या असून उर्वरित काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची अनेक कामे गावातूनच होणार आहेत. ग्रामपंचायतींसोबतच त्या गावातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, बँका व इतर शासकीय कार्यालयांमध्येही मागणीनुसार हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट