शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली व देसाईगंजमध्ये २९ इमारती धोकादायक

By admin | Updated: June 13, 2014 00:08 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली दोन नगर पालिकांतर्गत २९ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १० इमारती गडचिरोली शहरात आहेत. तर १९ इमारती देसाईगंजमध्ये आहेत. यातील चार या अतिशय धोकादायक आहेत. प्रत्येक पावसाळ्याच्यावेळी सदर इमारत मालकांना नोटीस बजाविली जाते. या पलिकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. गडचिरोली नगर पालिकेने दोन वर्षापूर्वी एक इमारत पाडली. ज्या नागरिकांनी इमारती संदर्भात तक्रार दिली किंवा माहिती दिली तरच अशा ठिकाणी पालिका प्रशासनान जाऊन पोहोचते व त्या इमारतीची पाहणी करून तिच्या पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो.

सध्यातरी या २९ इमारतींसह जिल्ह्यातील १२ तालुक्यात १२५ ते १५० इमारती या जीर्णावस्थेत असल्याच्या नोंदी त्या-त्या ग्रामपंचायतीकडे आहेत. परंतु गावतपातळीवर इमारत पाडण्याचे काम ग्रामपंचायतीची यंत्रणा करत नाही. अनेक इमारतींना टेकू लावून त्या इमारती तशाच ठेवल्या जातात. व पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना अशा इमारती कारणीभूत ठरतात. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अनेक जुन्या इमारती आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा अजूनही अशा इमारतीत चालतात. ग्रामीण भागात अनेक घरे मातीचे असून पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भिंती ओल्या होऊन कोसळू नये याकरीता या भिंतींना तुराट्यांचे कडे बांधले जातात. तसेच अनेक ठिकाणी फाटे लावून भिंतींना आधार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याची कारवाई होत नाही. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातच २९ इमारती मोडकळीस आलेल्या व धोकादायक आहेत. गतवर्षी आरमोरी तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गडचिरोली शहरात व देसाईगंमध्ये अशा इमारती अधिक असल्याने येथे पावसाळ्यापूर्वी पाडण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे. परंतु नगर पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)