शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सव्वादोन वर्षांत २ हजार ८५८ रूग्ण किडनी आजारग्रस्त

By admin | Updated: March 10, 2016 02:17 IST

संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढत असतांनाच शरिराच्या आंतरिक बिघाडामुळे रूग्णांची अधिक भर पडत असल्याचे विविध आजारांवरून अनेकदा स्पष्ट होत आहे.

जागतिक किडनी दिन : जिल्ह्यात दर महिन्यात दीडशेवर रूग्णांवर उपचारगोपाल लाजूरकर गडचिरोलीसंसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढत असतांनाच शरिराच्या आंतरिक बिघाडामुळे रूग्णांची अधिक भर पडत असल्याचे विविध आजारांवरून अनेकदा स्पष्ट होत आहे. या किडनी आजाराचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात किडनी (मूत्रपिंड) आजाराचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जानेवारी २०१४ ते मार्च २०१६ या जवळपास सव्वादोन वर्षाच्या काळात जिल्ह्यात २ हजार ८५८ किडनी आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. रोगग्रस्त संपूर्ण रूग्ण सध्या उपचारादाखल आहेत. उच्च रक्तदाब, मूत्रखडा, यासह विविध आजारांमुळे किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सदर आजार बळावू नये याकरिता खबरदारी घ्यावी. किडनी आजारावर औषधोपचार करतानांच पुनर्उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीनुसारही किडनी आजारावर वेळीच अंशत: नियंत्रण मिळविता येते. मात्र आजाराची तीव्रता अधिक वाढल्यास उपचार पद्धतीला रूग्ण योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ शकत नाही. प्रसंगी मृत्यूसुद्धा ओढवतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात किडनी आजारासाठी योग्य उपचार पद्धती उपलब्ध आहे.