शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१२९ पदांसाठी २८ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:29 IST

नक्षलविरोधी अभियानामुळे सीमेवरील लष्कराप्रमाणे असुरक्षित जीवन असतानाही गडचिरोली पोलीस दलात भरती होण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींनी झुंबड केली आहे.

ठळक मुद्देबेरोजगारीची अशीही तीव्रता : ९ पासून सुरू होणार पोलीस भरती

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानामुळे सीमेवरील लष्कराप्रमाणे असुरक्षित जीवन असतानाही गडचिरोली पोलीस दलात भरती होण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींनी झुंबड केली आहे. अवघ्या १२९ पदांच्या या भरतीसाठी तब्बल २८ हजार १७० अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत. यावरून जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या किती भीषण आहे याची कल्पना येते.राज्याच्या गृह विभागाकडून यावर्षी गडचिरोली पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीसाठी ९ मार्चपासून प्रत्यक्ष शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात होणार आहे. सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित करून नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्यात शिपाई पदासाठी १२९ जणांची भरती होणार आहे. त्यात ज्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले आहे त्यावरून एका पदामागे २१८ उमेदवारांची अर्ज भरल्याचे दिसून येते. पोलीस विभाग या भरतीच्या तयारीला लागला आहे.१२९ पदांपैकी खुल्या गटासाठी ९९, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४ व इतर प्रवर्गासाठी पद निश्चित केले आहेत. त्यात पुरूष ४२ तर महिलांसाठी ३९ पद राखीव आहेत. याशिवाय खेळाडूंसाठी ६, प्रकल्पग्रस्तांसाठी ६, भूकंपग्रस्तांसाठी २, माजी सैनिकांसाठी १९, अंशकालीन पदवीधरांसाठी ६, पोलीस पाल्यांसाठी ३ आणि होमगार्ड जवानांसाठी ६ पद राखीव राहणार आहेत.४६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभागपोलीस भरतीची ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून ४६२ पुलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यात अपर पोलीस अधीक्षक १, उपविभागीय पोलीस अधिकारी ४, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक ५५ या अधिकाऱ्यांसह पुरूष कर्मचारी १५२ आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी २४० आदींचा सहभाग राहणार आहे.पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारप्रभारी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी सांगितले की भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची संख्या वाढविली जाईल. आरएसआयडी तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रक्रियेत केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.