शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

२८ नागरिकांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, लॉकडाऊन व सुगंधित तंबाखूचा खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर कडक प्रतिबंध लावले आहेत.

ठळक मुद्देनियमांची ऐसीतैसी : मास्क न वापरणे व खर्रा खाऊन थुंकणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व मास्क न घालता फिरणाºया २८ नागरिकांवर २४ जुलै रोजी धानोरा शहरात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर व थुंकणाऱ्यावर कायद्याने प्रतिबंध असला तरी व त्या माध्यमातून वेळोवेळी दंडात्मक कारवाई होत असली तरीही धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. खर्रा खाऊन थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विदृप होऊन वेळोवेळी रंगरंगोटी करावी लागते. त्यामुळे जनतेने कररूपात दिलेला पैसा विनाकारण खर्च होतो. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, लॉकडाऊन व सुगंधित तंबाखूचा खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर कडक प्रतिबंध लावले आहेत. तरी सुद्धा धानोरा शहरातील अनेक नागरिक सर्रास खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत होते. अनेक नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत होते.याबाबीची दखल घेऊन नगर पंचायत, पोलीस स्टेशन व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने धानोरा शहरात फिरून दुकानाची तपासणी केली व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये याविषयी समज दिली. तसेच विना मास्क फिरणाऱ्या व खर्रा खाऊन थुंकणाऱ्या एकूण २८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचेकडून ३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई नगर पंचायत मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी, मुक्तीपथ गडचिरोलीचे उपसंचालक संतोष सावळकर, मुक्तीपथ धानोरा तालुका प्रभारी अक्षय पेद्दीवार, नगर पंचायत कर्मचारी गुलाब ठाकरे, उमेश नागपुरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.गडचिरोली पालिकेला कारवाई मुहूर्त सापडेनाविनामास्क फिरणाऱ्या व खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांची गडचिरोली शहरात प्रचंड संख्या आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र न.प.ला कारवाईसाठी मुहूर्त अजूनही सापडला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या