हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली : नगर पंचायतीचा बुडत आहे लाखोंचा महसूल सिरोंचा : सिरोंचा शहरातील बाजारवाडीत तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने मच्छी, मटन, चिकन व इतर व्यावसायिकांकरिता भाड्याने देण्यासाठी लाखो रूपये खर्च करून २७ दुकान गाळे बांधले. मात्र या दुकान गाळ्यांची हस्तांतरण प्रक्रिया रखडल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सदर सर्वच दुकान गाळे धूळ खात पडले आहेत. परिणामी विद्यमान नगर पंचायतीचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे .तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रा. पं. सदस्यांनी व्यावसायिकांना सदर दुकान गाळे वाटप करण्याची प्रक्रिया राबविली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अटी व शर्तीनुसार प्रत्येक व्यावसायिकाकडून दरमहा ३०० रूपये भाडे रकमेची नोंद रजिस्टरवर करण्यात आली. मात्र १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेण्यात आला नाही. त्यामुळे दुकान गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली. तेव्हापासून दुकान गाळे रिकामेच पडून आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच दुकान गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून व्यावसायिकांना दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सिरोंचा शहरातील नागरिकांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)वर्षाला ९७ हजारांचे नुकसानदरमहा ३०० रूपये किरायाप्रमाणे २७ दुकान गाळ्यांचे महिन्याला ८ हजार १०० रूपये होतात. तर महिन्यांचे ९७ हजार २०० रूपये होतात. दोन वर्षांचे १ लाख ९४ हजार ४०० रूपये होतात. प्रशासनाने दुकान गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया पार न पाडल्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान नगर पंचायत प्रशासनाला सोसावे लागत आहे. या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न सिरोंचावासीयांनी उपस्थित केला आहे.
सिरोंचातील २७ दुकानगाळे धूळ खात
By admin | Updated: January 31, 2016 01:33 IST