शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजारांवर दमा रूग्णांनी घेतले औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:11 IST

देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दमा रोगावरचे औषध वितरित करण्यात आले. सदर औषध घेण्यासाठी देशभरातून २५ हजार पेक्षा अधिक रूग्ण कोकडीत दाखल झाले. सायंकाळी ६ वाजेपासून औषधी वितरणाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देकोकडीत वितरण । मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशीचा मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दमा रोगावरचे औषध वितरित करण्यात आले. सदर औषध घेण्यासाठी देशभरातून २५ हजार पेक्षा अधिक रूग्ण कोकडीत दाखल झाले. सायंकाळी ६ वाजेपासून औषधी वितरणाला सुरूवात झाली. औषधी घेण्यासाठी दमा रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दमा रूग्णांनी कोकडी गाव फुलून गेले होते.प्रदुषणामुळे दिवसेंदिवस दमा रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करूनही दमा रोग कधीकधी बरा होत नाही. दमा रोगावर कोकडी येथील प्रल्हाद कावळे मोफत औषधी वितरित करतात. सदर औषधी केवळ मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वितरित केली जाते. अनेकांना या औषधीचा लाभ झाला असल्याने दिवसेंदिवस दमा रूग्णांवर औषध घेण्यासाठी कोकडी येथे येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ८ जून रोजी दमा औषधीचे वितरण केले जाणार असल्याने पहिल्याच दिवशी छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्टÑातील नागरिक कोकडी येथे डेरेदाखल झाले. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून औषधीच्या वितरणाला सुरूवात झाली. आपल्याला औषधी लवकर मिळावी, यासाठी नागरिक दुपारपासूनच रांगेत लागले होते. जवळपास अर्ध्या किमी अंतराच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. दमा रूग्णांनी कोकडी गाव फुलून गेले होते. रात्री पुन्हा कोकडी येथे दमा रूग्णांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. दमा औषधीचे वितरण करण्यास संपूर्ण गावाने मदत केली.औषधी वितरणाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार कृष्णा जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.कृष्णा गजबे, माजी आ. हरीराम वरखडे, भाग्यवान खोब्रागडे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं.स. उपाध्यक्ष गोपाल उईके, न.पं. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अर्चना ढोरे, सुधीर वाढई, परसराम टिकले, दिगांबर मेश्राम, डॉ. नामदेव किरसान, राजू जेठाणी, नरेश विठ्ठलानी, मन्साराम बुध्दे, पोलीस पाटील कापगते, बन्सोड उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद कावळे यांचा सपत्निक सत्कार झाला.