शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगाव व विष्णूपूर येथून २५ लाख रूपयांच्या दारूसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 02:34 IST

चामोर्शी व मुरूमागाव पोलिसांनी त्यांच्या क्षेत्रात कारवाई करून सुमारे २५ लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे.

मुरूमगाव व चामोर्शी पोलिसांची कारवाई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोहफुलाची दारू काढण्याचे प्रमाण वाढले चामोर्शी/मुरूमगाव : चामोर्शी व मुरूमागाव पोलिसांनी त्यांच्या क्षेत्रात कारवाई करून सुमारे २५ लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर मुरूमगाव पोलिसांनी दोन आरोपिंनाही अटक केली आहे. छत्तीसगडवरून गडचिरोलीकडे दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मुरूमगाव पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार मुरूमगाव पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. दोन्ही वाहने येताच ती थांबवून झडती घेतली असता, वाहनांमध्ये विदेशी कंपनीच्या ९५ पेट्या दारू आढळून आली आहे. त्याचबरोबर दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्व मुद्देमालाची किमत २३ लाख रूपये एवढी होते. या प्रकरणी दीपक शिवकुमारसिंग (३२), दलजितसिंग गुरूबच्चनसिंग (२८) दोघेही रा. भिलाई छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीजी ०७ बीए ४०३०, सीजी ०७ एवाय १९४० क्रमांकाचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पीएसआय प्रविण जरदे, दानिश मन्सुरी, पोलीस हवालदार गावडे, सहारे, अन्नपत्रवार, मडकाम, मोखाडे, कोल्हे, पेंदाम, तोडासे, चिकराम, मडावी, चौधरी, ढोरे, उसेंडी यांनी केली. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, सचिन गावळे, सहायक फौजदार अशोक कुमरे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विष्णूपूर येथील नाल्याशेजारी असलेला मोहफूल दारूअड्डे उद्ध्वस्त करून येथून १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केले. पोलिसांनी लक्ष्मण निताई मंडल, उज्ज्वल हितेश मंडल, मनोज खितीश मंडल, लहु तारकेश्वर हलदर यांच्याकडून मोहफूल दारू, सडवा, दारूभट्टीकरिता लागणारे लोखंडी ड्रम, प्लास्टिक बॅरेल, चाटू, टिनाचे पिंप असा एकूण ५६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईतील नवग्राम जंगल परिसरातून मोहफूल दारूभट्टीवरून ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर मुद्देमाल राकेश रंगो दास, सरोजीत हर्षीद शिखधर, अजय सुखलाल हलदर यांच्याकडून जप्त केला. आरोपी जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक कापुरे, गावडे, सहायक फौजदार अशोक कुमरे यांच्यासह पोलीस हवालदार कोसनकर, नीलकंठ कोकोडे, रेमाजी धुर्वे, पोलीस शिपाई संतोष भांडेकर आदींनी केली.