शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतून विनावाहक २४ थेट बसफेऱ्या सुरू

By admin | Updated: September 25, 2016 01:50 IST

राज्य परिवहन महामंडळाचे गडचिरोली येथील विभागीय नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांनी गडचिरोली आगारात वाहकांची संख्या कमी असल्यामुळे

विभागीय नियंत्रकांचा निर्णय : दर अर्ध्या तासाने चंद्रपूरकरिता बसफेरीगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाचे गडचिरोली येथील विभागीय नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांनी गडचिरोली आगारात वाहकांची संख्या कमी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नवे धोरण आखले आहे. त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून गडचिरोली येथून चंद्रपूरसाठी दिवसातून तब्बल २४ बसफेऱ्या थेट सुरू केल्या आहे. या थेट बसफेऱ्यांमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवाशी सुखावले असले तरी व्याहाड बूज, व्याहाड खुर्द व सावली तसेच चंद्रपूर मार्गावरील इतर भागातील प्रवाशांची अडचण झाली आहे. विभागीय नियंत्रक गव्हाळे हे येथे रूजू झाल्यानंतर त्यांनी बसफेऱ्या, चालक, वाहक तसेच इतर मनुष्यबळाबाबतचा सविस्तर आढावा कर्मचाऱ्यांकडून घेतला. निलंबित झालेले अनेक बसवाहक पुन्हा एसटीच्या सेवेत रूजू होत नाही. याशिवाय अत्यल्प वेतन असल्याने अनेक चालक, वाहक काही वर्षात राज्य परिवहन महामंडळाची नोकरी सोडून जातात. त्यामुळे गडचिरोली आगारासह राज्यभरात चालक व वाहकाचे पदे दरवर्षी झपाट्याने रिक्त होत आहेत. रिक्त पदांमुळे आगाराच्या दैनंदिन बसफेऱ्यांवर मोठा परिणाम होतो. एसटीची प्रवाशी वाहतूक प्रभावित होऊ नये, यासाठी एसटी वाहक कमी असतानाही ‘विनावाहक’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय विभागीय नियंत्रक गव्हाळे यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. गडचिरोलीवरून थेट चंद्रपूरकडे जाणाऱ्या दिवसातून २४ बसफेऱ्यांचा थांबा केवळ मूल व चंद्रपूर येथेच देण्यात आला आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गडचिरोली आगारामार्फत चांगली सेवा मिळत आहे. दर अर्ध्या तासाने चंद्रपूरसाठी थेट बसफेरी असल्याने चंद्रपूर व मूलला जाणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा (ताटकळत राहणे) संपली आहे. चंद्रपूर ते गडचिरोली दररोज अपडाऊन करणारे शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना सदर बसफेरी सुलभ झाली आहे. मात्र या बसफेरीच्या चालकाला तिकीट कापण्याची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागत आहे. खाजगी बससेवेला फटका बसला आहे. (प्रतिनिधी)विनावाहक दैनंदिन बसफेऱ्यांचे वेळापत्रकगडचिरोली आगारातून चंद्रपूरसाठी विनावाहक दिवसातील पहिली बसफेरी सकाळी ७ वाजता रवाना होते. दुसरी बसफेरी ७.३० वाजता, तिसरी ८.०० वाजता, चौथी ८.३० त्यानंतर ९.३०, १०.००, १०.३०, ११.००, ११.३०, ११.००, दुपारी १२.००, १२.३०, १.००, १.३०, २.००, २.३०, ३.००, ३.३० अशा प्रकारे अर्ध्या तासाने गडचिरोली आगारातून चंद्रपूरसाठी थेट बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोलीवरून चंद्रपूरसाठी शेवटची विनावाहक थेट बसफेरी ६.३० वाजता सोडली जात आहे. गडचिरोली आगाराच्या या बसफेऱ्यांमुळे चंद्रपूर मार्गावरील लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवाशी खासगी ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी टॅक्सींना मिळेनासे झाले आहेत. सदर खासगी वाहनधारक आपल्या वाहनात व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, सावली व तसेच इतर ठिकाणी उतरणारे प्रवाशी चढवत आहेत.