भाजपाचा पुढाकार : उपजिल्हा रूग्णालयात शिबिर कुरखेडा : भारतीय जनता पार्टी व उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा यांच्या वतीने गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे २४ भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, पं.स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, नगरसेविका नंदीनी दखणे, स्वाती नंदनवार, जगदिश दखणे, उल्हास देशमुख, बंटी देवढगले आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरादरम्यान भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव चांगदेव फाये, नगरसेवक नागेश फाये, तालुका संघटक जलालभाई सय्यद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष क्रिष्णा नरोटे, विनोद नागपूरकर, परिचंद साखरे, डॉ. पूर्णानंद नेवारे, मनोहर कापगते, रूपेश चांदेवार, विनोद खुणे, राहूल गिरडकर, श्रावण देशमुख, दिवाकर दरवडे, युवराज शेंडे, क्रिष्णा पटेल, ललित चचाणे, प्रमोद तुलावी, सुनिल दरवडे, हितेश पटेल, डुलचंद जनबंधू, शावेज आजमी, पेंदाम यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, डॉ. नितीन हुमने, इशाक तुरक, हरिश्चंद्र मैंद्र, कल्पना भट यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडात २४ जणांचे रक्तदान
By admin | Updated: July 24, 2016 01:40 IST