पानठेल्यांवर धाड : पोलीस व आरोग्य विभागाचे पथक लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने गडचिरोली शहरातील पानठेल्यांवर धाड टाकून २४ दुकानदारांवर कारवाई केली आहे. राज्यभरात सुगंधीत तंबाखू विक्रीवर बंदी असली तरी गडचिरोली जिल्ह्यात सुगंधीत तंबाखूची विक्री केली जात आहे. ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात येताच भरारी पथक तयार करून शहरातील पानठेल्यांवर मंगळवारी धाड टाकण्यात आली. या भरारी पथकाचे नेतृत्व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा सल्लागार डॉ. कैलाश नगराळे, डॉ. राजन यादव, पोलीस निरिक्षक नलावडे यांनी केले. यावेळी डॉ. सोनाली कुंभारे, दिनेश खोरगडे, नंदेश्वर सोडेकर, शंकर तोगरे, स्नेहल संतोषवार, निलेश सुबेदार, सुरज वनकर आदी उपस्थित होते. तंबाखूयुक्त पदार्थाच्या व्यसनावर कायद्याप्रमाणे धोक्याच्या सूचना नव्हत्या.
२४ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई
By admin | Updated: July 5, 2017 01:15 IST