दोन गंभीर : मोर्चा आटोपून परत जाताना उडेरानजीक घडली घटनाएटापल्ली : सुरजागड लोह प्रकल्पाच्या मुद्याला घेऊन काढण्यात आलेला मोर्चा आटोपल्यानंतर मोर्चेकरी लोकांना विसामुंडीकडे घेऊन जाणारा ट्रॅक्टर तुमरगुंडा-उडेरा दरम्यान उडेरानजीकच्या बांबू डेपोजवळ उलटल्याने २३ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये दोन गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये आठ महिला व १५ पुरूषांचा समावेश आहे. एटापल्ली येथे मोर्चा असल्यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागातून अनेक नागरिक ट्रॅक्टर व इतर वाहनाने एटापल्लीला आले होते. दरम्यान मोर्चा आटोपल्यानंतर एटापल्लीवरून विसामुंडीकडे जाणारा ट्रॅक्टर उडेरा बांबू डेपोनजीक उलटला. या घटनेची माहिती मिळताच एटापल्ली नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार, राकाँचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, विनोद पत्तीवार, संभा हिचामी यांनी वाहनाची व्यवस्था करून जखमींना एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आयतू मडावी (५६), अनिल पोरतेट (२५) रा. विसामुंडी हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींमध्ये रमेश मडावी (३५), कवडो मडावी (४५), रावजी वेलादी (२५), शामराव मडावी (३०), जया मडावी (२०), चिंता तलांडी (३५), अमशी तलांडी (४५), सुशिला तलांडी (४५), दुलसा कांदो (२२), कविता मडावी (२०), रामा पुंगाटी (४०), सर्व रा. विसामुंडी यांचा समावेश आहे. या अपघातातील ट्रॅक्टर वाहन चालक योगेश तोरे चालवित होता. अपघातातील जखमींवर एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ. अश्विन वलके, डॉ. माणिक धकाते, डॉ. पंकज कवडे उपचार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
ट्रॅक्टर उलटल्याने २३ जण जखमी
By admin | Updated: April 21, 2016 01:42 IST