शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२१ पासून कृषी व गोंडवन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:17 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथील मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रात्यक्षिक दाखविणार : विविध विभागांचे लागणार ३०० स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथील मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध विभागांचे ३०० स्टॉल राहतील, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी दिली आहे.२१ डिसेंबर रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते राहतील. मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, कृषी सभापती नाना नाकाडे, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आत्माचे संचालक अनिल बन्सोडे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित राहतील.२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर चर्चासत्र व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील. प्रदर्शनात विविध पिकांचे प्रात्यक्षिके, सेंद्रीय शेती मालाची विक्री, कृषीपुरक उद्योग माहिती व तंत्रज्ञान, क्रेता-विक्रेता खरेदी विक्री मेळावा, कृषी उपयोगी विविध अवजारांची प्रदर्शनी, विविध प्रजातींचे पशु व दुग्ध उत्पादन विषयावर कार्यशाळा, मत्स्यपालन प्रदर्शन, रेशीम कीटक संगोपण आदींचे स्टॉल राहतील.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ४५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी मागील वर्षीच्या प्रदर्शनाला ९ हजार ५० शेतकऱ्यांनी भेट दिली. यावर्षी किमान १५ हजार शेतकरी भेट देतील, अशी अपेक्षा डॉ. पवार यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला डीआरडीएचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जयंत टेंभुर्णे, दीपक सोरते, ए. बी. पंधरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती