शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

२१५ रोहित्रांमध्ये बिघाड

By admin | Updated: December 6, 2014 01:28 IST

जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता.

गडचिरोली : जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता. रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बिघडल्यानंतर गावातील विद्युत पुरवठा किमान ८ ते १५ दिवस ठप्प राहत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला आहे. मुख्य विद्युत लाईनच्या सहाय्याने गावापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. या मुख्य लाईनचा व्होल्टेज ४४० चा राहतो. या व्होल्टेजवर घरगुती उपकरणे जळण्याची शक्यता राहते. हे व्होल्टेज कमी करून २३० व्होल्टेजचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावाशेजारी विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार २५४ विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गावातील विद्युतचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत रोहीत्र व्यवस्थित काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत रोहित्रांची वेळोवेळी देखभाल करणे या अंतर्गत एका विशिष्ट कालावधीनंतर त्यामध्ये असलेले तेल बदलविणे व विशिष्ट उपकरणे बदलविणे गरजेचे आहे. मात्र विद्युत कर्मचारी बऱ्याच वेळा विद्युत रोहित्रांची देखभाल करीत नाही. त्यामुळे विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण होते. मुख्य लाईनमधून विद्युतचा पुरवठा ४४० व्होल्टपेक्षा अधिक झाल्यानेही विद्युत रोहीत्र जळण्याची अधिक शक्यता राहते. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विद्युत दाब कमी-जास्त झाल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी असले तरी देखभालीअभावी रोहित्र जळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामीण व दुर्गम भागातील रोहित्रांची वेळोवेळी देखभाल घेत नसल्यानेच एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला. रोहित्रांमध्ये बिघाड आल्यावर गावातील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प पडतो. रोहीत्र जळाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक याबद्दलची तक्रार करतात. मात्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन किमान १५ ते २० दिवस रोहीत्र दुरूस्त करीत नाही. परिणामी नागरिकांना अंधारातच कित्येक दिवस काढावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात रोहीत्र जळण्याचे प्रमाण सर्वाधिक राहत असून रस्त्यांअभावी रोहीत्र दुरूस्त करतानाही वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लोकसंख्येचे घनतेचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. ५ ते १० किमी अंतरावर एखादे खेडे असून त्यामध्ये केवळ १० ते २० च घरे आहेत. परिणामी वीज ग्राहकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एका वीज कर्मचाऱ्याकडे २० ते २५ किमी परिसरातील गावे सोपविली आहेत. एका कर्मचाऱ्याला किमान २५ ते ३० रोहित्रांच्या देखभालीचे काम करावे लागते. या सर्व परिस्थितीमुळे देखभालीकडे दुर्लक्ष होऊनरोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. (नगर प्रतिनिधी)