शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

२१२ शिक्षकांवर कारवाई होणार

By admin | Updated: June 11, 2014 00:03 IST

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

बनावट बदली प्रकरण : विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने शिक्षण खात्यात खळबळगडचिरोली : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी बनावट बदली झालेल्या २१२ शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.मागील सत्रात जिल्हा परिषदेत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी व काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने वर्षभर शिक्षकांच्या बनावट बदल्या केल्या. यामध्ये ५ कोटी रूपयाची उलाढाल झाल्याचा आरोप अनेक शिक्षकांकडून करण्यात आला होता. वर्षभर झालेल्या शिक्षकांच्या बदली आदेशावर संदर्भ नसणे, बनावट जावक क्रमांक टाकणे, आयुक्ताची पुर्वपरवानगी न घेता बदल्या करणे, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीचा संदर्भ बदली आदेशावर टाकणे तसेच २५ आॅक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार केवळ ८ शिक्षकांशी सामजस्य आपसी बदलीसाठी नोटशीट असतांना १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या. या बदली आदेशावर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्कॅनिंग केल्याचे आदेश काढणे असे प्रकार घडले. यामुळे शहरी भागातून दुर्गम भागात गेलेले शिक्षक, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांना दोन ते अडीच लाख शिक्षकांना दोन महिन्यातच शहरी भागातील शाळेवर पदस्थापना देण्याचे आदेशही काढण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा शिक्षकाअभावी ओसाड पडल्या. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. या प्रकरणाबाबत शासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने मागील महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये चौकशी समिती पाठविली. यामध्ये बनावट बदल्यावर ठपका ठेवून शिक्षण विभागावर कडक ताशेरे ओढण्यात आले. या प्रकरणात २१२ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या झाल्याचे लक्षात आले. यामुळे या २१२ शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. सदर बनावट बदली प्रकरण उजेडात आल्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी व शिक्षकांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बनावट बदली केलेल्या शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी. तसेच या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)