शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

मेळाव्यात २०२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:22 IST

उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्देदामरंचा उपपोलीस स्टेशनचा पुढाकार : २६ गावांतील तीन हजारांवर अधिक नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, गणेश मोरे, अप्पासाहेब पडळकर, व्यंकट गंगलवाड यांच्यासह महाराष्टÑ पोलीस मित्र परिवार पुणे, एनएनएस टीमचे सदस्य, आठवण गु्रपचे सदस्य, अविष्कार अ‍ॅकॅडमीचे सदस्य उपस्थित होते. २०२ जोडप्यांची उपपोलीस स्टेशनमधून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातून फेरी घातल्यानंतर मिरवणुकीचा समारोपही पोलीस स्टेशनमध्येच करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान नागरिक तसेच पोलीस अधिकाºयांनी ढोल, ताशांच्या गजरावर ताल धरला. या मेळाव्याला आशा, वेलगूर, भंगारामपेठा, दामरंचा या गावातील जवळपास तीन हजार नागरिक उपस्थित होते. लग्न समारंभासाठी आलेल्या वºहाड्यांसाठी भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतीसाठी शासन शेकडो कोटी रूपये खर्च करीत आहे. या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीपूरक रोजगार करावा, धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. गावातील ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून याबाबतची माहिती घ्यावी व अर्ज करावा, पोलीस विभाग नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी तत्पर आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग सुद्धा पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी नक्षल्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गायकवाड यांनी केले. पोलीस विभागाच्या वतीने जोडप्यांना भेट वस्तू देण्यात आले.