शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

२०० गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: July 11, 2016 01:14 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती.

भामरागड शहर पाण्याखाली : दुसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम; १० मार्ग बंदगडचिरोली : मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती. जिल्ह्यातील जवळजवळ २०० गावांचा संपर्क अतिवृष्टीमुळे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेलाच आहे. तर जवळजवळ १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात विठ्ठलरावपेठा येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या. गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तसेच बाजूला असणाऱ्या गोसेखुर्द धरणातून विसर्ग चालू असल्याने सर्वच नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढत आहे. काही गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष ए. एस. आर नायक यांनी केले आहे.सर्व तहसीलदारांना रविवारी नदी आणी नाल्याजवळील गावांना भेट देउन बाधित होणा-या कुटुंबाना सतर्कतेचा इशारा द्यावा तसेच गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावे. जिवीत वा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. पुलावरून पाणी वाहते अशा ठिकाणी वाहतूक वेळीच बंद करण्यात यावी अशाही सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली आहे.