शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी आरोपींना २० वर्षांचा कारावास

By admin | Updated: July 22, 2016 01:16 IST

आलापल्ली येथे जांभूळ विकण्यासाठी आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावी सोडून देण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन नराधम ...

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : आलापल्ली परिसरात झाला होता अत्याचार गडचिरोली : आलापल्ली येथे जांभूळ विकण्यासाठी आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावी सोडून देण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन नराधम आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी २० वर्षांचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावली. किशोर खगेंद्रनाथ मंडल व प्रदीप परिमल बिश्वास दोघेही रा. मोदुमोडगू ता. अहेरी अशी आरोपींची नावे आहेत. बलात्कार घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित मुलीच्या आईने अहेरी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात पीडित मुलगी व इतर साक्षीदारांचे सरकार पक्षातर्फे बयान नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरला व २१ जुलै रोजी दोन्ही आरोपींना कलम ३७६ (ड) अन्वये दोषी ठरवून २० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पीएसआय जयेश खंदरकर, नितीन शिंदे यांनी काम पाहिले. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला पाच हजार रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास तत्कालीन एसडीपीओ रमेश धुमाळ, ठाणेदार ढवळे यांनी केला. (नगर प्रतिनिधी) अशी घडली घटना २८ जून २०१४ रोजी पीडित मुलगी ही आपल्या चुलत भावाबरोबर जांभूळ विकण्यासाठी आलापल्ली येथे बसने आली होती. जांभूळ विकून झाल्यानंतर सायंकाळी ८ वाजताच्यादरम्यान ती आलापल्ली बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. त्याच ठिकाणी मासे विकत असलेल्या किशोर मंडल व प्रदीप बिश्वास हे दोघेही मुलीजवळ जाऊन तिला गावी जाण्यासाठी बस नसल्याने दुचाकीने सोडून देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे पीडित मुलगी व तिचा चुलत भाऊ हे दोघेही आरोपींच्या दुचाकीवर बसले. गावापासून १ किमी अंतरावर मोटारसायकलमधील पेट्रोल कमी आहे म्हणून आरोपी किशोर याने त्याचा साथीदार आरोपी प्रदीप यास पीडित मुलीच्या भावास घरी सोडून वापस येण्यास सांगितले. त्यानंतर किशोरने त्या मुलीला नाल्याकडे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ती मुलगी बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला ६० रूपये देऊन आरोपींना पळ काढला. संबंधित घटना मुलीने आईला सांगितली.