शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

By admin | Updated: August 4, 2016 01:25 IST

भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या

जलयुक्त शिवारचे यश : तीन हजारांहून अधिक कामे पूर्ण; जलयुक्त गावे जाहीर होणार गडचिरोली : भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावात जलसंधारणाची तब्बल ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. या कामातून एकूण २०५२६.४० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी व्यर्थ जाऊ नये, पावसाळ्यातील पाण्याचा अपव्यय टाळून पाणीसाठ्याची क्षमता अधिकाधिक वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढविणे तसेच टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली व अभियानाच्या आढाव्यात या गावांचा समावेश करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जि.प. सिंचाई, लघुसिंचन व पाटबंधारे चंद्रपूर विभागाच्या वतीने एकूण ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. १६७ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मजगीचे ७९७, भात खाचर ९, माती नाला बांध ४३, माती नाला दुरूस्तीचे ३४, सिमेंट नाला बांध ५२, सिमेंट नाला बंधारा २२९, शेततळे ८४४, बोडी दुरूस्ती नुतनीकरणाचे ५४६, गाळ काढण्याची ९२, वन तलाव ४, खोदतळे ४०२, सीसीटी २२६, मामा तलाव दुरूस्तीचे ३८, गावतलाव दुरूस्तीचे ५, कालवे दुरूस्तीचे तीन कामे पूर्ण करण्यात आली. साठवण बंधारा दुरूस्तीचे २७, कोल्हापुरी बंधारा निर्मितीचे ४३, साठवण बंधारातून गाळ काढण्याबाबतचे ३६, मामा तलावातील गाळ काढण्याचे ६२, सिंचन विहीर निर्मितीचे ८१ कामे पूर्ण करण्यात आले. शेततळे व इतर कामातून गतवर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले. तसेच भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने पुढील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) निर्माण झालेला पाणीसाठा मजगीच्या ७९७ कामातून ६०१७.३५ टीसीएम, ४३ माती नाला बांधकामातून ५१६ टीसीएम, सिमेंट नाला बांधकामातून ७८० टीसीएम, ८४४ शेततळ्याच्या कामातून ३७०६.८५ टीसीएम, बोडी नुतनीकरणातून ५८९६.८० टीसीएम, खोदतळ्यातून १७६५.५८, मामा तलाव दुरूस्तीतून १९० टीसीएम, कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीतून १३५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून जिल्हाभरात ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. यांनी घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार अंतर्गत गतवर्षी १५२ गावात विविध कामे घेण्यात आली. यंदाही १६९ गावात जलसंधारणाची अनेक कामे होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जलयुक्त शिवार कामातून सिंचन क्षेत्र वाढले असून भूजल पातळी वाढत आहे. जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची अद्यावत गणना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.