गडचिरोली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार ७७.०५ किमीचे २० रस्ते बांधण्याला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी एकूण ४८ कोटी २३ लाख ७२ हजार रूपयांचा खर्च येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २० रस्त्यांच्या कामाला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. हे रस्ते ७७.०५ किमीचे आहेत. रस्ते बांधण्यासाठी ४५ कोटी ९ लाख ६५ हजार रूपयांचा खर्च येणार आहे. तर पुढील वर्ष या रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी ३ कोटी १४ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. एवढ्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या रस्त्यांमध्ये कुरखेडा तालुक्यातील ५.५७ किमीचा मुख्य मार्ग ते गरगडा कटंगटोला रस्ता, १.३९ किमी लांबीचा वडेगाव ते धुटीटोला मार्ग, देसाईगंज तालुक्यातील ३.९७ किमीचा शिवराजपूर ते उसेगाव मार्ग, आरमोरी तालुक्यातील ६.३० किमीचा आरमोरी ते शिवणी मार्ग, धानोरा तालुक्यातील ४.५५ किमीचा , प्ररामा-१० ते दुधमाळा-मिचगाव मार्ग, २.०५ किमीचा निमगाव ते मोहटोला मार्ग, ७० किमीचा प्ररामा-१० ते राजोली मार्ग, १.४१ किमीचा प्ररामा-१० ते गवळहेटी रस्ता, गडचिरोली तालुक्यातील ५.९९ किमीचा प्ररामा-११ नगरी ते पोर्ला रस्ता, चामोर्शी तालुक्याती ३.५२ किमीचा इजिमा-५९ चाखलपेठ ते मोहुर्ली रस्ता, ४.७९ किमीचा कोनसरी ते जयरामपूर रस्ता, सिरोंचा तालुक्यातील १.५० किमीचा प्ररामा-९ ते गर्गापेठा रस्ता, अहेरी तालुक्यातील ४.१२ किमीचा प्ररामा-९ उमानूर ते जोगनगुडा रस्ता, ३.९६ किमीचा सुधागुडा ते भस्वापूर मार्ग, २.७५ किमीचा प्ररामा-९ ते इटलचेरू मार्ग, एटापल्ली तालुक्यातील ६.०८ किमीचा प्रजिमा-२० ते वासामुंडी रस्ता, ४.६० किमीचा रामा-३८३ ते हालेवारा ते कोठी रस्ता, एटापल्ली तालुक्यातील ५ किमीचा उडेरा ते मरक रस्ता, भामरागड तालुक्यातील ३.७० किमीचा रामा-३८२ ते कुडकेली रस्ता, ३.१० किमीचा रामा-३८२ ते कुमारगुडा रस्ता बांधण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. लवरच निविधा काढल्या जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
मुख्यमंत्री योजनेतून २० रस्त्यांची दुरूस्ती
By admin | Updated: April 16, 2016 01:00 IST