शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२० प्रकरणे काढली निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:26 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार आरमोरी व चामोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले.

ठळक मुद्देआरमोरी व चामोर्शीत लोकअदालत : प्रलंबित फौजदारी व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/चामोर्शी : न्यायालयाच्या आदेशानुसार आरमोरी व चामोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी आरमोरी येथे एकूण १४ तसेच चामोर्शी येथे सहा प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.आरमोरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित खटले व बँक, एमएसईबी, पाणी कर व इतर दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी फौजदारी प्रलंबित सहा व एक दिवाणी प्रकरण ठेवण्यात आले होते. यापैकी तीन फौजदारी प्रकरणे ४१ हजार रूपयांच्या रकमेने निकाली काढण्यात आली. तसेच दाखलपूर्व १६३ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे, ३१ हजार तसेच एमएसईबीच्या ११० प्रकरणांपैकी तीन प्रकरणे २ हजार ९३० एवढ्या रकमेने निकाली काढण्यात आली. दाखलपूर्व एकूण तीन प्रकरणांपैकी महिला बचत गटाची दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक न्यायालयाला दिवाणी न्यायाधीश संजय अटकारे, अभिवक्ता बी. बी. जांभूळकर, पॅनल सदस्य आर. आर. पाचपांडे उपस्थित होते. याप्रसंगी सहायक अधीक्षक काकडे, प्रतिभा आत्राम, देवकर, रामटेके, पाटील, दोनाडकर, रामटेके यांनी सहकार्य केले.चामोर्शी येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने राष्टÑीय लोकअदालीचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण दिवाणी स्वरूपाचे १२ व फौजदारी स्वरूपाचे १३ व वादपूर्व राष्ट्रीयकृत बँकेचे ८२ व विद्युत विभागाचे ५० असे एकूण १३२ प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी न्यायालयातील प्रलंबित तीन प्रकरणात तसेच विद्युत विभागाच्या तीन प्रकरणात समजोता करण्यात आला, असे एकूण सहा प्रकरणे लोकअदालतीत निकाली काढण्यात आली. लोकअदालतीला पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी एम. झेड. ए. ए. क्यू. कुरेशी यांनी काम पाहिले. सदस्य म्हणून अ‍ॅड. अमर तुरे, अनिल कुकडकार यांनी काम पाहिले. याप्रसंगी अ‍ॅड. के. टी. सातपुते, अ‍ॅड. डिम्पल उंदीरवाडे, अ‍ॅड. व्ही. जी. चिळंगे, अ‍ॅड. एम. डी. सहारे उपस्थित होते. पुणेकर, पी. डी. कोसारे, नेताजी करंडे, विनायक सहारे, सुधाकर भिसे, आशिष भुर्रे, महल्ले, जयंत मल्लेलवार, लता उईके, पोहरकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालय