शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील 'ही' अतिसंवेदनशील गावं १० दिवसांपासून अंधारात; विद्युत विभाग झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 16:50 IST

दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने विद्युत खांबांची तारे तुटून पडली यामुळे मयालघाट व मुरकुटी या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

ठळक मुद्देमाहिती देऊनही विद्युत विभागाचा कानाडोळा

गडचिरोलीकोरची तालुक्यातील नागरिकांसाठी सध्या सर्वात मोठी डोकेदुखी बनलेली सेवा म्हणजे विद्युत सेवा. तालुक्यातील अतिसंवेदनशील आदिवासी बहुल मुरकुटी व मयालघाट या गावांमध्ये मागील दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत माहिती देण्यात आली असतानाही विद्युत विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी येथील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये उकाड्यात दिवस व अंधारात रात्र काढावी लागत आहे.

दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने मयालघाट व मुरकुटी या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीवर मोठे झाड पडले. त्यामुळे दोन खांब व सहा ते सात खाबांवरची तारे तुटून खाली पडली. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसे तर कोरची तालुक्यातील नागरिकांसाठी वारंवार विद्युत सेवा खंडित होणे हे नवीन नाही. मात्र, संबंधित विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे व कंत्राटदार तबरेज शेख यांना याबाबद माहिती देऊनसुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कोरची तालुक्यातील वीज वितरण विभागाच्या विद्युत दुरुस्तीचे कंत्राट चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील तबरेज शेख यांच्याकडे आहे. त्यांच्याशी फोनवरून विचारणा केली असता, विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी सध्या काम करणारे मजूर मिळत नाही. मजूर मिळाले की काम करणार, अस त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखी किती दिवस येथील नागरिकांना अंधारात राहावे लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरची येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे प्रभार आहे. त्यांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते. विद्युत पुरवठा खंडित झाले की दोन दिवसात कंत्राटदारांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते, ठीक आहे मी कामाला सुरुवात करायला सांगतो आणि लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे फोनवरून विचारणा केली असता माहिती दिली आहे.

रवींद्र गाडगे, अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली.

टॅग्स :electricityवीजgadchiroli-acगडचिरोली