शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

By admin | Updated: March 31, 2017 01:04 IST

दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे ...

सहा दिवसापासून लिंक फेल : गडचिरोलीतील आरक्षण केंद्रातील दोष बीएसएनएलला सापडला नाहीगडचिरोली : दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. सहा दिवस उलटूनही भारत संचार निगमला येथील दोष अजूनही सापडलेला नसल्याने रेल्वे आरक्षण केंद्राचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. मागील शुक्रवारपासून लिंक फेल झाली असून रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज हे रेल्वे स्थानक असून गडचिरोली येथे तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून रेल्वे आरक्षण केंद्र नगर पालिका इमारतीच्या परिसरात सुरू करण्यात आले. सुरूवातीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हे आरक्षण केंद्र सुरू राहत होते. त्यानंतर आता खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नामुळे या आरक्षण केंद्राचा वेळ एक तासाने वाढवून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या रेल्वे आरक्षण केंद्रावर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी येतात. दररोज रेल्वे आरक्षण केंद्राची उलाढाल ४० ते ४५ हजार रूपयांची आहे. मात्र आता उन्हाळ्याचा सिजन सुरू झाल्याने आरक्षण केंद्रावर दररोज गर्दी दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील इंटरनेट सेवेत दोष निर्माण झाला असल्याने लिंक फेल झालेली आहे. येथील रेल्वे विभागाचे अधिकारी प्रशांत वैद्य यांनी लेखी व तोंडी स्वरूपात भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर दोन ते तीन दिवसाने दोष शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. अजूनपर्यंत दोष सापडला नाही. बीएसएनएलचे पथक येथे बुधवारी काम करीत होते. परंतु त्यांना दोष मिळाला नाही. त्यामुळे मागील रविवार वगळता सहा दिवसात रेल्वे आरक्षण केंद्राला २ लाख ७० हजार रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ व सर्वसाधारण कोणतेच रिर्झवेशन लिंक फेल असल्याने मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे आरक्षण केंद्राच्या अधिकाऱ्याचीही गोची झाली आहे. तिकीट घेण्यासाठी येणारे नागरिक केवळ चौकशी करून परत जात आहे. काहींना चंद्रपूर तर काहींना देसाईगंज येथे जाऊन तिकीट काढण्याची पाळी आली आहे. भारत संचार निगमने तत्काळ या आरक्षण केंद्रावरील लिंकचा दोष दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)मागील शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील लिंक फेल झाली आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे आरक्षण तिकीट येथून निघत नाही. बीएसएनएलचे कर्मचारी दोष शोधण्यासाठी येऊन गेलेत. परंतु त्यांना दोष सापडला नाही. दररोज ४० ते ४५ हजार रूपयांच्या तिकीटा येथून काढल्या जातात. आता पूर्ण काम ठप्प झाले आहे. याबाबत आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. - प्रशांत वैद्य, अधिकारी, रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गडचिरोली