शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात.

ठळक मुद्देबँकांना निर्देश : को-आॅपरेटीव्ह बँकेला सर्वाधिक टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२० च्या खरीप व रबी हंगामात जिल्हाभरातील ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना १९९ कोटी १८ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नसल्याने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०२० च्या खरीप व रबी हंगामासाठी ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना किमान १९९ कोटी १८ हजार रुपयांचे कर्ज वितरित करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत बँका कधीच कर्ज वाटप करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी किती कर्ज वाटप करतात, याकडे लक्ष लागले आहे.कर्ज वितरण प्रक्रियेला कोरोनाचा फटकाकोरोनामुळे बँकेत शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केवळ पैसे काढणे व पैसे घेणे यावर मुख्य भर द्यावा, असे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्यवर्ती कार्यालयांनी बँकांना दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केवळ पैसे काढणे व पैसे भरणे एवढेच व्यवहार केले जात होते. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र आणखी काही दिवस थांबा, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.मागील वर्षी ९६ कोटींचे कर्ज वितरणमागील वर्षी खरीप हंगामासाठी १५७ कोटी तर रबी हंगामासाठी २३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामासाठी ९५ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले. तर रबी हंगामासाठी केवळ २६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांकडे आता सिंचनाची सुविधा झाल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातही रबी हंगामाचे पीक घेतात. मात्र रबी हंगामासाठी कर्ज दिले जाते. याची अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे ते कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. काही शेतकरी खरीप पिकाची तोडणी झाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज