शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

१९६ कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त होणार

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

कुष्ठ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम : सहायक संचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देशदेसाईगंज : कुष्ठ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. असे असतानाही मात्र कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत राज्यातील एकूण १९६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ मार्च रोजी गुरूवारला कार्यमुक्तीचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे.यापूर्वी महात्मा गांधी जयंतीपासून कुष्ठरोगदिन आणि पंधरवडा साजरा केला जात असताना, केंद्र सरकारने कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्तीतून पुन्हा वाढीव आदेश देण्यात आले होते. मात्र गुरूवारी ३१ मार्च रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भारमुक्तीचा आदेश धडकल्याने खळबळ माजली आहे.राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुष्ठरोग निर्मुलनाच्या कामासाठी एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ११ महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात आली. हे कर्मचारी जिल्हा व तालुकास्तरावर काम करीत आहेत. दरम्यान पुणे येथील सहायक संचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील सहायक संचालक (कुष्ठरोग) यांना पत्र पाठवून ३१ मार्चपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकारने कुष्ठरोग निर्मुलनासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान मंजूर केले नसल्याचे सहायक संचालकाच्या पत्रात नमूद आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक कुष्ठ रूग्ण आहे. शासनामार्फत २ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच १९ ते ३१ आॅक्टोबर व ३० जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान कुष्ठ रूग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कुष्ठ रूग्ण शोधण्यास मदत झाली. तसेच या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात कुष्ठ रूग्ण आढळून आले. (तालुका प्रतिनिधी)