शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संचारबंदीचा परिणाम : सीसी रस्त्याच्या कामासाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : भूमिगत नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील १९ मजूर कर्नाटक राजाच्या बिजापूर तालुक्यातील कोलार येथे चार महिन्यापूर्वी गेले. सदर मजूर कोरोनाच्या संचारबंदीमुळे कर्नाटक राज्यात अडकले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले असून काम बंद झाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र सरकारने सदर १९ मजुरांना मदत करावी, अशी मागणी अडकलेल्या मजुरांनी केली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तू व इतर साधन सामग्री पूर्णत: संपल्याने १९ मजुरांना कोलारचे पोलीस स्टेशन गाठले. आम्हाला महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी द्या, नाही तर भोजनाची व्यवस्था करा, अशी विनंती केली. मात्र त्यांना हवी तशी मदत मिळाली नाही. तसेच जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. देशभर संचारबंदी लागू झाली असून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. गाव सोडून कर्नाटक राज्यातील कोलार शहरातील गेलेले १९ मजूर अडकून पडले. या मजुरांना सरकारने मदत करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. अडकून पडलेल्या मजुरांमध्ये अनिल चौके, नितीन मानकर, विकास देवनाथ, देव्रत माझी, निखील सूर्यवशी, देवेंद्र राय, सुनिल माझी, पंकज सरकार, सचिन ठाकरे, रियाज शेख, अश्विन नेवारे, अजय मडावी, मुकेश माझी, त्रिलोक धोगडे, शूक्षय मंडल, सपन मुजुमदार, त्रिदेव मित्री, प्रदिप माटे, सुजल सरकार व दिनेश माझी आदींचा समावेश आहे.नेहरपायलीतील १४ मजूर अडकलेकुरखेडा तालुक्याच्या नेहरपायली या गावातील १४ मजूर मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगणातील पिंजरमडगू गावात गेले. मात्र आता कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने ते मजूर तेलंगणातच अडकून पडले आहेत. तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्याच्या कानपल्ली तालुक्यातील पिंजर मडगू गावात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची तोडण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील मजूर या गावात रोजगारासाठी गेले. मात्र आता संचारबंदीने हे मजूर तेलंगणात अडकले आहेत. स्थानिकस्तरावर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.भेंडाळा परिसरातील नागरिकही दुसऱ्या राज्यातचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरातील कान्होली, कळमगाव, एकोडी, सगणापूर, घारगाव, खोपुर्डी, रामाळा, दोटकुली, मोहुर्ली, फराडा, वाघोली, भेंडाळा, वेलतूर आदी गावातील मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेले आहेत. कान्होली येथील जवळपास १०० नागरिक तेलंगणाच्या खमंग जिल्ह्यातील केसपल्ली येथे अडकले आहेत. परंतु संचारबंदी लागू असल्याने त्यांना स्वगावी येण्यासाठी अडचणी येत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार