शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पासाठी १.८३ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:30 IST

गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप थोडे बदलावे लागणार आहे. त्यासाठी १ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांच्या निधीस नगर विकास विभागाकडून मंजुरी मिळाली.

ठळक मुद्देनवीन उपकरणांची खरेदी : कचऱ्याचे जागीच करावे लागणार विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप थोडे बदलावे लागणार आहे. त्यासाठी १ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांच्या निधीस नगर विकास विभागाकडून मंजुरी मिळाली.गडचिरोली नगर परिषदेकडून सध्या नाल्यांची सफाई करून निघणाºया गाळाची तसेच कंटेनरमध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक करून विलगीकरण करीत विल्हेवाट लावणे यासाठी वार्षिक २ कोटी २३ लाख रुपयांचे तीन कंत्राट देण्यात आले आहेत. त्यात घनकचऱ्याचे विलगीकरण खरपुंडी येथील ४.६८ हेक्टर जागेवरील केंद्रावर माणसांच्या हातून केले जाते. मात्र आता यांत्रिकी पद्धतीने हे विलगीकरण जागेवरच करावे लागणार असून त्यासाठी नगर परिषदेला यंत्रसामग्रीची खरेदी करावी लागणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत (नागरी) शहरे स्वच्छ करण्याचा एक भाग म्हणून हा घनकचरा प्रकल्प गडचिरोली शहरासाठी मंजूर झाला. १.८३ कोटींच्या या प्रकल्पासाठी ६४ लाख केंद्र शासनाकडून ४२ लाख राज्य शासनाकडून तसेच १४ व्या वित्त आयोगामधून ७६ लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी दोन टप्प्यात मिळणार आहे.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मूळ प्रकल्पाच्या किमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाली तरी राज्य शासनामार्फत त्यासाठी कोणतेही वाढीव अनुदान उपलब्ध केले जाणार नाही. प्रथम हप्त्याचा निधी मिळाल्यानंतर निधीचे विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनास सादर केल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित केला जाणार आहे.शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून तो कचरा वेगवेगळा संकलित करणे अत्यावश्यक राहणार आहे. या विलगीकरण केलेल्या ओल्या कचºयावर केंद्रीत अथवा विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. सध्या गडचिरोलीत नगर परिषदेच्या वतीने ओल्या कचºयापासून गांढूळ खताची निर्मिती केली जात आहे.