शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

१८ हजार वाहनांची भर

By admin | Updated: April 28, 2017 01:07 IST

पूर्वीच्या तुलनेत आता आधुनिक युगात दुचाकी व चारचाकी वाहनांची गरज माणसाला अधिक भासत आहे.

वर्षभरात : वाहन परवानाधारकांची संख्या झपाट्याने वाढली गडचिरोली : पूर्वीच्या तुलनेत आता आधुनिक युगात दुचाकी व चारचाकी वाहनांची गरज माणसाला अधिक भासत आहे. त्यामुळे सर्वच वर्गातील लोकांकडे वाहन उपलब्ध झाले आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जिप्स व इतर सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजारांवर वाहनांची नव्याने भर पडली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ८ हजार ८१६ इतकी नोंदणीकृती वाहने होती. आता ३१ मार्च २०१७ पर्यंत वाहन संख्येचा हा आकडा १ लाख १९ हजार ८९९ इतका झाला आहे. वाढत्या वाहन संख्येसोबतच वाहन परवाना काढणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २००८-०९ मध्ये सर्व प्रकारची दुचाकी व चारचाकी मिळून एकूण ४१ हजार ३६९ वाहन संख्या गडचिरोली जिल्ह्यात होती. २००९-१० मध्ये वाहन संख्या ४६ हजार ८२९ वर पोहोचली. वर्षभरात ४ हजार ४६० नव्या वाहनांची भर पडली होती. त्यानंतर २०१०-११ मध्ये नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या ५४ हजार ३०६ होती. २००९-१० तुलनेत सन २०१०-११ मध्ये वर्षभरात ७ हजार ४७७ इतक्या नव्या वाहनांची भर पडली. २०११-१२ या वर्षात नोंदणीकृत वाहनांची संख्या ६२ हजार ४६९ होती. २०१०-११ च्या तुलनेत २०११-१२ मध्ये ८ हजार १६३ इतक्या नव्या वाहनांची भर पडली. सातत्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहन संख्या वाढून ती २०१२-१३ मध्ये ७२ हजार १२७ वर पोहोचली. वर्षभरात ९ हजार ६५८ नव्या वाहनांची जिल्ह्यात भर पडली. सन २०१३-१४ मध्ये ३१ मार्च अखेर एकूण ८३ हजार ५२२ इतकी नोंदणीकृत वाहनसंख्या होती. सन २०१२-१३ च्या तुलनेत सन २०१३-१४ मध्ये ११ हजार ३९५ इतक्या नव्या वाहनांची भर पडली. सन २०१४-१५ या वर्षात ९५ हजार ११५ इतकी नोंदणीकृत वाहन संख्या होती. या वर्षात नव्याने ११ हजार ५९८ वाहनांची भर पडली. सन २०१५-१६ मध्ये २०१४-१५ च्या तुलनेत एकूण १३ हजार ७०१ नवी वाहने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली. ३१ मार्च २०१६ अखेर आरटीओ कार्यालयाकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १ लाख ८ हजार ८१६ इतक्या वाहनांची नोंदणी होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने अधिक प्रदूषण करणाऱ्या बीएस-३ च्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर बंदी घातली. त्यामुळे सदर निर्णय माहित होताच या वाहनांच्या किमतीत १० ते १५ टक्क्याने कमी करून अशी वाहने ग्राहकांच्या माथी मारण्यात आली. त्यामुळे कधी नव्हे इतके सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात नव्या वाहनांची भर पडली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीकडे सद्यस्थितीत नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या १ लाख १९ हजार ८९९ इतकी आहे. शहरी भागात प्रत्येक घरी दोन पेक्षा अधिक दुचाकी वाहने आहेत. पूर्वी ग्रामीण भागात नागरिक सायकलनेच प्रवास करीत होते. मात्र ग्रामीण भागातही ३० टक्के लोकांकडे दुचाकी वाहने उपलब्ध आहेत. वाहन संख्या वाढल्याने पेट्रोलपंपावरही नेहमी गर्दी असते. (स्थानिक प्रतिनिधी) महिन्याला एक हजार दुचाकींची नोंदणी नवे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर त्यांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करणे कायद्याने बंधनकारक आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी नव्या एक हजार दुचाकी व चारचाकी वाहनांची भर पडते. यामध्ये ९५ टक्के दुचाकी वाहनांचा समावेश असतो. सन २०१६-१७ या वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १८ हजार नव्या वाहनांची भर पडली. यामध्ये १५ हजारांच्या आसपास दुचाकी वाहनांची संख्या आहे. उर्वरित ट्रॅक्टर, ट्रेलर, जिप्स, टॅक्सी, मोपेड व इतर वाहनांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात माल वाहक व प्रवाशी वाहनांची संख्याही दरवर्षी वाढत असल्याने नोंदणीच्या स्वरूपात गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लाखो रूपयांचा महसूल मिळत आहे.