वर्षभरातील नोंदणी : दहा वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सर्वाधिक वाहने दाखललोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पूर्वीच्या तुलनेत आता आधुनिक युगात दुचाकी व चारचाकी वाहनांची गरज माणसाला अधिक भासत आहे. त्यामुळे सर्वच वर्गातील लोकांकडे वाहन उपलब्ध झाले आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जिप्स व इतर सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजारवर वाहनांची नव्याने भर पडली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ८ हजार ८१६ इतकी नोंदणीकृती वाहने होती. आता ३१ मार्च २०१७ पर्यंत वाहन संख्येचा हा आकडा १ लाख १९ हजार ८९९ इतका झाला आहे. वाढत्या वाहन संख्येसोबतच वाहन परवाना काढणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढली आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २००८-०९ मध्ये सर्व प्रकारची दुचाकी व चारचाकी मिळून एकूण ४१ हजार ३६९ वाहन संख्या गडचिरोली जिल्ह्यात होती. २००९-१० मध्ये वाहन संख्या ४६ हजार ८२९ वर पोहोचली. वर्षभरात ४ हजार ४६० नव्या वाहनांची भर पडली होती. त्यानंतर २०१०-११ मध्ये नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या ५४ हजार ३०६ होती. २००९-१० तुलनेत सन २०१०-११ मध्ये वर्षभरात ७ हजार ४७७ इतक्या नव्या वाहनांची भर पडली.२०११-१२ या वर्षात नोंदणीकृत वाहनांची संख्या ६२ हजार ४६९ होती. २०१०-११ च्या तुलनेत २०११-१२ मध्ये ८ हजार १६३ इतक्या नव्या वाहनांची भर पडली. सातत्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहन संख्या वाढून ती २०१२-१३ मध्ये ७२ हजार १२७ वर पोहोचली. वर्षभरात ९ हजार ६५८ नव्या वाहनांची जिल्ह्यात भर पडली. सन २०१३-१४ मध्ये ३१ मार्च अखेर एकूण ८३ हजार ५२२ इतकी नोंदणीकृत वाहनसंख्या होती. सन २०१२-१३ च्या तुलनेत सन २०१३-१४ मध्ये ११ हजार ३९५ इतक्या नव्या वाहनांची भर पडली. सन २०१४-१५ या वर्षात ९५ हजार ११५ इतकी नोंदणीकृत वाहन संख्या होती. या वर्षात नव्याने ११ हजार ५९८ वाहनांची भर पडली. सन २०१५-१६ मध्ये २०१४-१५ च्या तुलनेत एकूण १३ हजार ७०१ नवी वाहने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली. ३१ मार्च २०१६ अखेर आरटीओ कार्यालयाकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १ लाख ८ हजार ८१६ इतक्या वाहनांची नोंदणी होती.
१८ हजारांवर वाहनांची भर
By admin | Updated: July 3, 2017 01:16 IST