शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

१८ हजार बालके कुपोषणग्रस्त

By admin | Updated: July 13, 2015 01:52 IST

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत.

लोकमत विशेषगडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत. विशेष म्हणजे यातील तीन हजार ४५७ बालके अतिकुपोषित असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त आहे. या भागामध्ये आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेकडो योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायातील नागरिकांना होत नाही. कित्येक महिने गावात आरोग्यसेवकच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांना मिळत नाही. कमकुवत आर्थिक परिस्थिती व जनजागृतीअभावी लहान मुलांना योग्य पोषण आहार उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने मे महिन्यात कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. यातील ३ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आढळून आले. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची यासारख्या दुर्गम व नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये सर्वाधिक कुपोषणाची समस्या असल्याचे दिसून येते. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने बालकांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहित नसल्याने कुपोषणाची समस्या तीव्र होते. गरोदर माताही योग्य आहार घेत नाही. त्यामुळे कुपोषणग्रस्त बालक जन्माला येते. कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी कुपोषणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली असता, हा दावा फोल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)दुर्गम भागातील पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरजगडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या १८ हजार १४२ असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी कुपोषित बालकांचा प्रत्यक्षात आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश लहान गावांमध्ये अजूनही अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील बालक व गरोदर मातांना पोषण आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्या गावातील कुपोषित बालकांची संख्याही आरोग्य विभागाला नेमकी माहीत पडत नाही.