शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

पशुसंवर्धन विभागात १८ पदे रिक्त

By admin | Updated: July 26, 2015 02:43 IST

तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागात एकूण ४५ पदे मंजूर आहेत. परंतु सद्य:स्थितीत एकूण पदांपैकी १८ पदे रिक्त असल्याने जनावरांवर ...

एटापल्ली : तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागात एकूण ४५ पदे मंजूर आहेत. परंतु सद्य:स्थितीत एकूण पदांपैकी १८ पदे रिक्त असल्याने जनावरांवर वेळीच औषधोपचार करण्याच्या कामात हयगय होत असल्याने पशुधन आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. तालुक्यातील पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गाची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम पशुवैद्यकीय सेवेवर होत आहे. अनेक पशुवैद्यकीय सेवेतील कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तालुका मुख्यालयातून कर्तव्यस्थळी ये- जा करतात. त्यामुळे अनेक पशुपालक जनावरांना दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही. गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसह मंजूर असलेली तिन्ही पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. या दवाखान्यांतर्गत २० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील अनेक पशुपालक २५ किमीची पायपीट करून एटापल्ली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ आणत आहेत. दुर्गम भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने पशुपालकांना पायदळीच जनावरांना दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरपंच हरीश पदा, उपसरपंच केशव कुळयेटी, ग्रा. पं. सदस्य रमेश वैरागडे, गुरूदास वैरागडे, शंकू भांडेकर, मधुकर पदा, किशोर सोमनकर, अविनाश सुरजागडे, वसंत भांडेकर, दीपक भांडेकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)